HSC, SSC Board Result 2022 : जूनच्या पुढील आठवड्यात 12 वी, तर शेवटच्या आठवड्यात 10 वी चा निकाल

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी निकाल प्रक्रिया आणि प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरु करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत होते.

maharashtra education minister varsha gaikwad declare date of mh board 10th and 12th result 2022
HSC,SSC Board Result 2022 : जूनच्या पुढच्या आठवड्यात 12 वीचा, तर शेवटच्या आठवड्यात 10 वीचा निकाल

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जूनच्या पुढील आठवड्यात इयत्ता 12 वी आणि शेवटच्या आठवड्यात इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर होणार आहे. अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. (Education Minister Varsha Gaikwad) दरम्यान दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. यंदा कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी पहिल्यांदा ऑफलाईन परीक्षा पार पडली. त्यामुळे यंदाचा निकाल हा विशेष असणार आहे. दरम्यान TET चा निकाल लवकरच लागणार असल्याची माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. (10th, 12th Board Exam Results 2022)

वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, यंदा दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जूनच्या पुढच्या आठवड्यात 12 वीचा निकाल लागेल. तर जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला दहावीचा निकाल लागू शकेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागू शकेल. शिवाय TET चा निकाल लवकरच लागणार आहे.  Maharashtra State Board Exam Result)

गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, तसेच अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. याच दरम्यान बोर्डाने विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा घेतल्या. यानंतर बोर्डाने या परीक्षांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीने लावण्याचे जाहीर केले, मात्र या परीक्षांचे निकाल कोरोना निर्बंध आणि त्यानंतरची परिस्थितीमुळे नेहमीपेक्षा उशीरा लागण्याची शक्यता होती. (10 and 12 Result 2022)

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी निकाल प्रक्रिया आणि प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरु करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत होते. मात्र आता पेपर तपासणी पूर्ण झाली असून मूल्यांकन प्रक्रिया सुरु आहेय त्यामुळे बारावीसह दहावीचे निकालही वेळेवर जाहीर होणार आहेत.