Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : महायुतीत वादाची ठिणगी? अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून झळकले...

Maharashtra Election 2024 : महायुतीत वादाची ठिणगी? अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर

Subscribe

काही ठिकाणी मतमोजणीच्या आधीच अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आपला उमेदवारी विजयी झालाच आहे, असे ठरवून बॅनर झळकावण्यास सुरुवात केली आहे. असाच काहीसा बॅनर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात झळकला असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट "मुख्यमंत्री अजित पवार" अशा आशयाचे बॅनर लावले आहेत.

मुंबई : राज्याच्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी (ता. 20 नोव्हेंबर) मतदान पार पडले. त्यानंतर आता शनिवारी (ता. 23 नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यात नेमकी कोणाची सत्ता येणार? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. पण काही ठिकाणी अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आपला उमेदवारी विजयी झालाच आहे, असे ठरवून बॅनर झळकावण्यास सुरुवात केली आहे. असाच काहीसा बॅनर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात झळकला असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट “मुख्यमंत्री अजित पवार” अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. ज्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Maharashtra Election 2024 Ajit Pawar banner as Chief Minister is likely to spark controversy in Mahayuti)

महायुतीत अद्यापही मुख्यमंत्रीपदाबाबतची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महायुतीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु, त्याआधीच अजित पवारांच्या समर्थकांनी त्यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावल्याने याबाबत महायुतीतील अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पुण्यातील नेते संतोष नांगरे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात महायुतीचे सरकार आल्यास अजित पवार मुख्यमंत्री होणार, असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, यावरून वाद सुरू झाल्यावर ही पोस्ट सोशल मीडियावरून हटविण्यात आली आहे. म्हणजेच भाजपा आणि शिवसेनेला (शिंदे गट) ही पोस्ट आवडलेली नाही.

- Advertisement -

हेही वाचा… Shivsena Vs Bjp : माहीममध्ये सरवणकरांना गुलिगत धोका! मतदानानंतर भाजपच्या नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

याशिवाय, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अजित पवारांचा पुन्हा मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. ज्या पोस्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ते पोस्टर बारामतीत लावण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार हे बारामतीतून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. युगेंद्र हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून थेट काकाच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. पण अतिउत्साही कार्यकर्ते ज्याप्रमाणे अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करू लागले आहेत, त्यावरून महायुतीत काय वाद होतो, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -