Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : बीडमध्ये उमेदवाराचा मृत्यू, तर साताऱ्यात मतदाराला हार्टऍटॅक

Maharashtra Election 2024 : बीडमध्ये उमेदवाराचा मृत्यू, तर साताऱ्यात मतदाराला हार्टऍटॅक

Subscribe

मतदानाच्या दिवशी बीडमध्ये एका अपक्ष उमेदवाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर साताऱ्यातही एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

बीड : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत आहे. अनेक नेतेमंडळींनी आणि सेलिब्रिटीजनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्यात अनेक भागातील मतदान केंद्रावर मतदारांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. तर अनेक ठिकाणी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांची रांग पाहायला मिळाली. परंतु, अशातच आता बीडमध्ये एका अपक्ष उमेदवाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर साताऱ्यातही एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. (Maharashtra Election 2024 Candidate Balasaheb Shinde dies in Beed, voter suffers heart attack in Satara)

समोर आलेल्या माहितीनुसार, मतदानाच्या दिवशीच बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळासाहेब हे बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यानंतर त्यांना बीड शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Mumbai Politics : मालाडमध्ये शिवसेनेच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा; निरुपम यांचा मुस्लीम कार्यकर्त्यांवर आरोप

तर, दुसरीकडे साताऱ्यातही एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्याच्या खंडाळ्यातील मोरवे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. शाम धायगुडे असं मतदानकर्त्याचं नाव आहे, ते 67 वर्षांचे होते. मतदान करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, परळीमध्ये वैजनाथ शहरातील सरस्वती विद्यालयातील केंद्राध्यक्ष जालिंदर जाधव यांनाही हृदयविकाराचा धक्का आला आहे. पण त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तर, जालिंधर जाधव हे केंद्राध्यक्ष असल्याने त्यांच्यानंतर या केंद्राची जबाबदारी राखीव केंद्राध्यक्षांकडे देण्यात आली.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -