Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रमराठवाडाMaharashtra Election 2024 : छ. संभाजीनगरमध्ये 5 कोटींची रक्कम जप्त तर...; पोलिसांनी...

Maharashtra Election 2024 : छ. संभाजीनगरमध्ये 5 कोटींची रक्कम जप्त तर…; पोलिसांनी दिली ही माहिती

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रामधील पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यावर कारवाई केली. 5 कोटी रुपये रक्कम तसेच 10 कोटींचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. अशामध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानेही राज्यात अनेक कारवाया केल्या आहेत. नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 कोटींची रक्कम आणि अंदाजे 10 कोटींचे सोने-चांदी जप्त करण्यात आले. यासंदर्भात विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाने माहिती दिली. (Maharashtra Election 2024 crime 5 crore seized ata check post)

हेही वाचा : Poster War : बाळासाहेब ठाकरेंची पुण्यतिथी अन् पोस्टर वॉरवरून दोन्ही शिवसेनेत जुंपली 

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रामधील संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड आणि धाराशिव इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. या परिक्षेत्रामध्ये 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. आचारसंहितेच्या काळामध्ये या क्षेत्रात पोलीस दलाने मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यावरील कारवाईवर भर देत अवैध दारू, अमली पदार्थ, गुटखा जप्त केला. पोलिसांनी परिक्षेत्रामध्ये देशी दारू, ताडी, हातभट्टी इत्यादींचे अड्डे उद्ध्वस्त करत 1500 गुन्हे दाखल केले. यामध्ये 2 लाख 65 हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच अंदाजे 2 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत 84 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 12500 किलो गुटखा जप्त करत अंदाजे 2 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

याचदरम्यान, शेतीच्या नावाने गांजाची लपवून शेती करणारे, नशेच्या गोळ्या, औषधांची विक्री करणाऱ्या आरोपींवर एनडीपीएस कलमानुसार 42 गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 28 क्विंटल अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. 3 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदीमध्ये 5 कोटींची रोख रक्कम आणि अंदाजे 10 कोटींचे सोने-चांदीदेखील जप्त करण्यात आली. पोलिसांसोबतच वाहतूक शाखेकडूनही या कालावधीत विशेष मोहीम राबवत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर 23 हजार केसेस करण्यात आले. यावेळी 2 कोटी दंड वसूल करण्यात आला. तसेच, सोशल मीडिया संदर्भातील आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 42 गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -