Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : पाठिंबा हवा असेल तर...; जानकरांनी ठेवल्या या अटी

Maharashtra Election 2024 : पाठिंबा हवा असेल तर…; जानकरांनी ठेवल्या या अटी

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लवकरच सर्वांसमोर येणार आहे. शनिवारी (23 नोव्हेंबर) हा निकाल लागणार असून यंदाच्या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार असून सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असे अंदाज बांधले जात आहेत. अशामध्ये आता अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तिसर्‍या आघाडीचे घटक पक्ष आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी, ‘आमचा पाठिंबा घेतल्याशिवाय कोणालाही सरकार स्थापन करता येणार नाही. मुख्यमंत्री हा अपक्षांचा होणार,’ असा दावा केला होता. त्यानंतर आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचे विधानदेखील चर्चेत आले आहे. (Maharashtra Election 2024 Mahadev Jankar on election result)

हेही वाचा : Maharashtra Election: सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात 

- Advertisement -

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुती आणि महाविकास आघाडीसमोर पाठिंबा हवा असल्यास अनेक अटी ठेवल्या आहेत. ते म्हणाले की, “कोणत्याही पक्षाला आमचा पाठिंबा हवा असे तर अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात जागा मिळायला हवी,” अशी अट त्यांनी घातली आहे. “महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून आम्हाला कोणाचाही फोन किंवा निमंत्रण आले नाही. पण आम्ही कोणाकडे पाठिंबा देण्यासाठी जाणारही नाही. पण जर आमचे 12 आमदार आले तर सर्वांना मंत्रिपद दिले पाहिजे. जर दोघांना वाटले तर मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा झाला पाहिजे. त्यांना हे मान्य असेल तरच आम्ही त्यांचे स्वागत करू आणि पाठिंबा देऊ,” असे म्हणत आपल्या अटी समोर ठेवल्या आहेत.

“महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधू-भगिनींचे आभार मानतो. लोकशाहीचा उत्सवामध्ये मतदारांचा टक्का वाढल्यामुळे अभिनंदन करतो. जो टक्का वाढलेला आहे, ती परिवर्तनाची शक्यता असू शकते. मागील विधानसभेत आमचा एक आमदार होता आणि वरच्या सभागृहात एक असे दोन आमदार होते. पण आता आमचे दोनाचे चार, चाराचे सहा असे वाढणार आहेत. जनतेचा कौल शेवटी, त्यांच्या हातात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास आहे,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. “बहुमत महाविकास आघाडी किंवा महायुतीला असेल तर आमचा कोणाला विरोध असेल असे नाही. सध्या महाविकास आघाडी बरोबर जायला तयार आहोत, महायुतीबरोबर पण जायला तयार आहोत. सध्यातरी 50 50 टक्के शक्यता आहे. आम्ही महायुती बरोबर पण नाही आणि महायुती सोबतही नाही. आम्ही छोटे पक्ष असल्यामुळे किंगमेकरची भूमिका बजावणार आहोत,” असे महादेव जानकर यांनी ठामपणे सांगितले.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -