Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : विकासकामांमुळे पुन्हा सत्तेत येणार; महायुतीच्या या नेत्याला विश्वास

Maharashtra Election 2024 : विकासकामांमुळे पुन्हा सत्तेत येणार; महायुतीच्या या नेत्याला विश्वास

Subscribe

राज्यातील जनतेने विकासाच्या मुद्द्यावर मतदान केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे कल्याणचे खासदार आणि शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

मुंबई : दोन दिवसापूर्वी राज्यात विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले आहे. तसेच आता उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबरला या मतदानासाठी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर या राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल की महाविकास आघाडीचे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच कल्याणचे खासदार आणि शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, राज्यातील जनतेने विकासाच्या मुद्द्यावर मतदान केले आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. (Mahayuti leader expressed confidence of mahayuti victory.)

हेही वाचा : Politics : भाजपाने घेतलेली उडी म्हणजे…, अदानी प्रकरणी ठाकरे गटाचा थेट हल्लाबोल

- Advertisement -

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. महायुती सरकार आणि महाविकास आघाडी या दोघांचे देखील भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त आहे. 23 नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीनंतर महाराष्ट्राच्या सत्तेचा मुकूट कोणाच्या डोक्यावर असेल ते समोर येईलच. मात्र त्या अगोदर श्रीकांत शिंदे यांनी निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. ते म्हणाले की, जनतेने विकासाच्या अजेंड्यावर मतदान केले आहे. तसेच आम्ही ज्या प्रकारे विकासकामे केली आहेत. अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच जनतेने पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी कौल दिला आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीने जनतेची दिशाभूल करून मुस्लिम आणि बौद्ध समाजाला धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणुकीत लोकांनी विकासाच्या अजेंड्यावरच मतदान केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : 2019 च्या तुलनेत मुंबई शहर आणि उपनगरातील मतदानात वाढ 

- Advertisement -

यंदा विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 विधानसभा जागांवर जवळपास 65 टक्के मतदान झाले आहे. तसेच 2019 मध्ये 61.74 टक्के मतदान झाले होते. महायुती सरकार राज्यात सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर महाविकास आघाडी महायुतीला राज्यातील सत्तेतून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोण सत्तेत राहणार आणि कोण विरोधात बसणार हे उद्या म्हणजे 23 नोव्हेंबरला कळणार आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -