Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसने केली आयोगाकडे...

Maharashtra Election 2024 : एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसने केली आयोगाकडे मागणी

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्री शिंदेंवर कारवाईची मागणी केली आहे. चांदिवली येथील महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांना मतदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. (Maharashtra Election 2024 MVA demanded files complaint against eknath shinde over poll code violations)

हेही वाचा : CBSE Exam : सीबीएसई बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना मुख्यमंत्री शिंदेंनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांचे हे कृत्य आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे आणि दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 171 आणि लोकप्रतिनिधी कायदा कलम 126 नुसार एफआयआर दाखल करण्याचे निर्देश साकीनाका पोलीस ठाण्याला द्यावेल, अशी लेखी तक्रार काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी केली आहे. निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मतदानाच्या दिवसाच्या 48 तास आधी इतर मतदारसंघातील उमेदवारांना किंवा कोणत्याही राजकीय नेत्याला त्यांच्या मतदारसंघाशिवाय इतर मतदारसंघात प्रवेश करण्यास मनाई आहे.

असे असतानाही चांदिवली मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी मतदान सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास काजूपाडा ग्रास कंपाऊंड ते सेंट ज्युड हायस्कूलपर्यंत रोड शो केला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. रोड शो परिसरात अनेक मतदान केंद्रे आहेत. हे आदर्श आचारसंहितेचे घोर उल्लंघन आहे आणि ही अनधिकृत उपस्थिती गंभीर चिंतेची बाब आहे आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांना बाधा आणणारी आहे, असे काँग्रेसने म्हंटले आहे.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -