Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 Result : शिंदे, फडणवीसांसह या निकालांकडे लक्ष; कोण मारणार...

Maharashtra Election 2024 Result : शिंदे, फडणवीसांसह या निकालांकडे लक्ष; कोण मारणार बाजी?

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य यावर अवलंबून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गजांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांत यावर अखेर उत्तर मिळालेच. दरम्यान, बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्याविरोधात संधी दिली आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Election 2024 Result Eknath Shinde Devendra Fadanvis and big fights to follow)

हेही वाचा : Maharashtra Election Result 2024 : मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यास काय होणार? 

- Advertisement -

कोपरी – पाचपाखाडी

ठाणे जिल्ह्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ ही या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची जागा आहे. शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथून निवडणूक लढवत आहेत. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघामध्ये 2009 त्यांचा एकदाही पराभव झालेला नाही. 2019 मध्ये कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे घाडीगावकर पांडुरंग यांचा 89,300 मतांनी पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेल्या दिघेंना गेल्या काही काळात घडलेल्या घटनांचा फायदा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर दक्षिण-पश्चिम

महाराष्ट्राच्या निवडणुकीत नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभेची जागाही महत्त्वाची आहे. इथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा रिंगणात आहेत. 1999 मध्ये देवेंद्र फडणवीस आमदार झाले. त्यानंतर 1999 आणि 2004 मध्ये फडणवीस नागपूर पश्चिम मतदारसंघातून निवडणून आले आहेत. गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे डॉ. आशिष देशमुख यांचा 49 हजार 344 मतांनी पराभव केला होता. यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रफुल्ल विनोद गुडधे (पाटील) नशीब आजमावत आहेत. 2014 मध्येही या जागेवर हे दोन्ही उमेदवार आमनेसामने होते.

- Advertisement -

बारामती

पुण्यातील बारामतीच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार ही शरद पवारांची आणखी एक पिढी राजकारणात उतरली आहे. ही तीच जागा आहे जिथून एकेकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार विजयी झाले होते. पण, गेल्या 7 निवडणुकांमध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार बारामतीतून विजयी होत आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार सर्वात जास्त विजयी झाले. त्यांनी बारामती मतदारसंघातून भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यावर 1,65,265 मतांनी विजय मिळवला. आता काकांपासून वेगळे झालेले अजित पवार पुन्हा एकदा बारामतीतून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात युगेंद्र हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यामुळे ही लढत रंजक होणार हे नक्की.

भंडारा – साकोली

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पटोले हे साकोली मतदारसंघातून 4 वेळा आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपचे डॉ. परिणय फुके यांचा 6240 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत भाजपने एक दिवस अगोदर पक्षात दाखल झालेले अविनाश ब्राह्मणकर यांना साकोलीत काँग्रेसचे नाना पटोले यांच्या विरोधात उमेदवारी दिली. अविनाश हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भंडारा जिल्हा परिषदेचे गटनेते होते.

वरळी

वरळी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विद्यमान आमदार आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघामधून लढत आहेत. तर, त्यांच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना महायुतीकडून उमेदवारी दिली आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरे यांचे विश्वासू शेलदार संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. 2019 च्या लढतीमध्ये आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत होते. त्यावेळी त्यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे सुरेश माने यांचा 70 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

माहिम 

मध्य मुंबईतील माहीम विधानसभेत तिरंगी लढत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे प्रथमच या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. तर याचठिकाणी शिवसेना ठाकरे गटातून महेश सावंत यांना तिकीट दिले. भाजपने अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला असला तरी शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -