मुंबई : राज्यभरात आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यातच जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या निवडणुकीत तीन आमदार निवडून आणता आले नाहीत, तर मनसेच्या अधिकृत पक्षाची मान्यता धोक्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (What will happen if MNS MLA is not elected?.)
हेही वाचा : Maharashtra Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत इतक्या अपक्षांनी दिला धक्का
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा आज निर्णय होणार आहे. या राज्यात नक्की कोणाची सत्ता येणार महायुती की महाविकास आघाडी याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. तसेच राज्यातील निवडणुकांचे निकाल आज दुपारपर्यंत स्पष्ट दिसतील. या निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याच फटका कदाचित राज ठाकरेंच्या मनसेला देखील पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तीन आमदार निवडून आले नाही, तर अधिकृत पक्षाची मान्यता धोक्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितले आहे.
हेही वाचा : Maharashtra Assembly Election 2014 Result : दावेदारांचे देव पाण्यात!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2007 मध्ये शिवसेनेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर 2009 मध्ये त्यांनी महाराष्ट्र दौरा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली आहे. पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरेंना महाराष्ट्राने भरभरुन प्रतिसाद दिला. पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेचे 13 आमदार निवडून आले. पण त्यानंतर मात्र मनसेची गती मंदावत गेली. 2019 च्या निवडणुकीत मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला आहे. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीमध्ये तीन आमदार आणि तीन टक्के मतं मनसेला मिळवावीच लागणार आहे, अन्यथा पक्षाची अधिकृत मान्यता धोक्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाने दिलेली मान्यता टिकविण्यासाठी मनसेला विधानसभा निवडणुकीत किमान तीन आमदार आणि तीन टक्के मतांची गरज आहे. 123 जागा लढणाऱ्या मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यास एकूण मतदानाच्या आठ टक्के मतांची गरज आहे. मनसेला तीन आमदार निवडून आणता आले नाहीत, तर अधिकृत पक्षाची मान्यता धोक्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे
Edited By Komal Pawar Govalkar