Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : पराभवाच्या भीतीने गुंडागर्दी, रोहित पवारांकडून भाजपा लक्ष्य

Maharashtra Election 2024 : पराभवाच्या भीतीने गुंडागर्दी, रोहित पवारांकडून भाजपा लक्ष्य

Subscribe

भाजपा कार्यकर्त्यांचा स्टाँग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भीतीने सुरू असलेली गुंडागर्दी आहे. पण पुढील चोवीस तासांतच कर्जत-जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही, अशी आशा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

(Maharashtra Election 2024) मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंग्राम सुरू आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले तर, उद्या, शनिवारी त्याचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर आरोप केला आहे. भाजपाच्या सुमारे 25-30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Rohit Pawar alleges that BJP workers tried to enter the strong room)

राज्यभरात मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक केंद्रावरील ईव्हीएम निर्धारित स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहे. तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. आता उद्या सकाळी ती मशिन्स पोलिसांच्या निगराणीत ठिकठिकाणच्या मतमोजणी केंद्रांवर नेण्यात येतील. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार नेते यांनी या सुरक्षेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

- Advertisement -

कर्जत-जामखेडमधील स्ट्राँग रूमबाबत त्यांनी ट्वीट केले आहे. भाजपाच्या सुमारे 25-30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे कार्यकर्ते आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपाच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलिस प्रशासनाने मात्र सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली, याची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

भाजपा कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भीतीने सुरू असलेली गुंडागर्दी आहे. पण पुढील चोवीस तासांतच कर्जत-जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra Election 2024 : Rohit Pawar alleges that BJP workers tried to enter the strong room)

हेही वाचा – Naseem Khan : काँग्रेस नेत्याच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघे जण ताब्यात


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -