Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : 113 वर्षांच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क; मुंबईत ज्येष्ठांमध्ये...

Maharashtra Election 2024 : 113 वर्षांच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क; मुंबईत ज्येष्ठांमध्ये उत्साह

Subscribe

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी तरुणांसोबतच ज्येष्ठ नागरिकांमध्येही मतदानाचा उत्साह पहायला मिळाला.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईत सकाळपासून मतदारांकडून निवडणूक उत्सव सुरू आहे. मुंबईत एकूण 1,02,29,708 मतदार आहेत. त्यापैकी 1,46,859 मतदार हे 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. या विधानसभा निवडणुकीत 85 वर्षांवरील बहुतांश मतदारांनी गृहमतदान केले. मात्र विशेष बाब म्हणजे नेपियन सी मार्ग येथील रहिवासी 113 वर्षे वय असलेल्या कांचनबेन नंदकिशोर बादशाह आणि ग्रँट रोड येथील 103 वर्ष वय असलेले जी. पारेख यांनी मलबार हिल केंद्रावर जावून मतदान केले. (Maharashtra Election 2024 senior citizens on voting day)

हेही वाचा : Ajit Pawar : पत्रकाराच्या प्रश्नावर अजितदादांनी दाखवलं मिडल फिंगर अन् करंगुळी; म्हणाले, “अरे वेड्यांनो…”

- Advertisement -

तब्बल 100 वर्षांपेक्षा जास्त वय असतानाही गृह मतदान न करता कांचनबेन आणि जी. पारेख यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन त्यांना योग्य वाटले अशा उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार त्यांनी बजावला. या वयात त्यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्याचा दाखवलेला उत्साह तरुणांनासुद्धा मागे टाकणारा असा ठरला आहे. यावेळी त्यांच्या मदतीसाठी निवडणूक अधिकारी, कर्मचारी पुढे सरसावले होते. मतदान केल्यानंतर त्यांना सुखरूप घरी जाण्यासाठी मतदान करण्यासाठीदेखील चांगले सहकार्य करण्यात आले. तसेच, कांचनबेन नंदकिशोर बादशाह यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -