Maharashtra Assembly Election 2024
घरनवी मुंबईMaharashtra Election 2024 : संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक; मतदान संपताच का केली कारवाई?

Maharashtra Election 2024 : संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक; मतदान संपताच का केली कारवाई?

Subscribe

नवी मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी काही भाग वगळता राज्यात अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. यादरम्यान, नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघातही बाचाबाची झाल्याचे समोर आले. संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाचे उमेदवार आणि आणि भाजपमध्ये वाद झाला. मतदान संपताच पोलिसांनी या प्रकरणी स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकूश कदम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ते ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असून त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra Election 2024 swarajya party candidate ankush kadam arrested by navi mumbai police)

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : राजकीय पक्षांचा अपक्ष उमेदवारांकडे मोर्चा 

- Advertisement -

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी अंकूश कदम यांच्यावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासह 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, मतदानादिवशी अंकुश कदम यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर मारहाण शिवीगाळ करत शांतता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मतदान प्रक्रिया संपण्याआधी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. यावर, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने हा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकूश कदम यांनी भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोपरखैरणे येथील कार्यालयाबाहेर लागलेल्या बुथवर येऊन मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून केला आहे. दरम्यान, ऐरोली मतदारसंघात चौरंगी लढत असणार आहे. भाजप महायुतीकडून गणेश नाईक, शिवसेना ठाकरे गटाकडून एम.के.मढवी आणि विजय चौगुले हे अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत. तसेच, याच मतदारसंघात तिसऱ्या आघाडीकडून स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -