Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : लोकशाहीवर दबाव आणण्याचा हा प्रकार, ठाकरे गटाचा भाजपावर...

Maharashtra Election 2024 : लोकशाहीवर दबाव आणण्याचा हा प्रकार, ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल

Subscribe

निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव वगैरे म्हणण्याची प्रथा आहे, मात्र तो आता फक्त पैशांचा उत्सव झाला. ज्या पद्धतीने या निवडणुकीत सत्तापक्षांकडून पैशांचा वादळी पाऊस पडत राहिला त्यावरून हेच म्हणावे लागेल. हे चित्र आपल्या लोकशाहीसाठी चांगले नाही.

(Maharashtra Election 2024) मुंबई : लोकशाही हाच देशाचा धर्म आहे. त्या धर्मासाठीच स्वातंत्र्याचा संग्राम झाला, पण निवडणुका म्हणजे धर्मयुद्ध असल्याचे सांगत भाजपा आणि संघाचे लोक घराघरात पोहोचले. लोकांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रासारख्या राज्यात हे घडत असताना देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री त्यांच्या सरकारी लवाजम्यासह महाराष्ट्रात तळ ठोकून बसले. लोकशाहीवर दबाव आणण्याचा हा प्रकार होता, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे. (Thackeray group criticizes BJP for using government machinery)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पंधरा-पंधरा दिवस एखाद्या राज्यात तंबू ठोकून बसणे लोकशाहीला घातक आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणेचा गैरवापर त्यात होतो. तो कालच्या निवडणुकीत झालाच आहे. तरीही महाराष्ट्राने सावधपणे मतदान केले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात नमूद केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Exit Poll Result 2024 : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती…काय सांगतात आकडे

निवडणुकांवर सट्टा लावला जातो आणि त्या सट्टेबाजीत शेकडो कोटींची उलाढाल होते. मतदार यादीतून लाखो मतदारांची नावे गायब केली जातात. धर्माच्या नावावर घाणेरडा प्रचार करून अखेरच्या क्षणी ताणतणाव वाढवून मतांसाठी ‘बांग’ मारली जाते. हिंदू-मुसलमान दुफळ्या माजवून ‘जिहाद जिहाद’ अशा आरोळ्या ठोकल्या जातात आणि तुमचा निवडणूक आयोग भाजपाचा मिंधा बनून हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत बसतो, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव वगैरे म्हणण्याची प्रथा आहे, मात्र तो आता फक्त पैशांचा उत्सव झाला. ज्या पद्धतीने या निवडणुकीत सत्तापक्षांकडून पैशांचा वादळी पाऊस पडत राहिला त्यावरून हेच म्हणावे लागेल. हे चित्र आपल्या लोकशाहीसाठी चांगले नाही. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले आहे की, या निवडणुकीत त्यांची प्रतिमा भंग करण्यासाठी भाजपाने पाचशे कोटी रुपयांचा खुर्दा केला. महाराष्ट्रात हा आकडा दोन हजार कोटींवर नक्कीच गेला असेल, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पैशांचे वाटप झाले. पैशांचा महापूरच आला. या महापुरात कोण कसे वाहून गेले आणि कोण निष्ठेच्या विटांवर तरले हे पुढच्या 72 तासांत कळेल, पण निवडणुका आता लोकशाहीचा उत्सव राहिला नसून भ्रष्ट पैशांचा उत्सव झाला, हे नक्की. लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाला, पण महाराष्ट्रात लोकशाही जिवंत राहील. महाराष्ट्राचा अभिमान विजयी होईल. पैशांच्या महापुरात मराठी स्वाभिमान वाहत गेला नसेल याबाबत शंका नसल्याचेही ठाकरे गटाने म्हटले आहे. (Maharashtra Election 2024: Thackeray group criticizes BJP for using government machinery)

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसने केली आयोगाकडे मागणी


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -