Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : ईव्हीएम है तो मुमकीन है, विधानसभा निकालावरून ठाकरे...

Maharashtra Election 2024 : ईव्हीएम है तो मुमकीन है, विधानसभा निकालावरून ठाकरे गटाचा घणाघात

Subscribe

आता त्याच मस्क महाशयांना म्हणे भारतीय ईव्हीएम यंत्रांनी एका दिवसात 64 कोटी मते कशी मोजली, याबद्दल आश्चर्याचा धक्का बसला आहे! मस्क महाशयच कशाला? भारतातील विरोधी पक्षांसह लाखो सुज्ञ नागरिकही ईव्हीएम यंत्रांबद्दल अचंबित आहेत, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

(Maharashtra Election 2024) मुंबई : गेल्या दहा वर्षांत झालेल्या विविध निवडणुकांत ‘ईव्हीएम’ नावाच्या ‘जादूगार’ यंत्रणेची कमाल दिसून आली आहे. त्यावर कडी केली आहे ती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी! अंधभक्त ‘मोदी है तो मुमकीन है’ असे म्हणत असतात, परंतु महाराष्ट्राच्या निकालांनी ‘ईव्हीएम है तो मुमकीन है’ हे सिद्ध केले आहे, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे. (Thackeray group doubts on EVM regarding assembly result)

अमेरिकन उद्योगपती आणि टेस्ला तसेच स्पेसेक्ससारख्या जगविख्यात उद्योगांचे प्रमुख एलॉन मस्क यांना भारतातील ईव्हीएम प्रणालीबद्दल प्रचंड अप्रूप वाटले आहे. ‘भारतातील ईव्हीएम यंत्रणेने एकाच दिवसात 64 कोटी मते मोजली आणि अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानाची मोजणी 18 दिवसांनंतरही सुरूच आहे,’ अशा शब्दांत मस्क यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय ईव्हीएमच्या मतमोजणीच्या वेगावरून आपण अचंबित झालो आहोत, असेही मस्क यांनी म्हटले असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात नमूद केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Raosaheb Danve : मुख्यमंत्रिपदाबाबत कोणालाच शब्द दिलेला नाही; दानवेंनी केले मोठे विधान

काहींना यात मस्क यांनी भारतीय मतदान व्यवस्थेचे कौतुक केले असे वाटले आहे. ईव्हीएमबद्दल त्यांची प्रतिक्रिया म्हणजे ईव्हीएमच्या सत्यतेबाबतचे जणू प्रमाणपत्रच, असेच त्यांना वाटत आहे. मात्र याच मस्क महाशयांनी फक्त सहाच महिन्यांपूर्वी भारतीय ईव्हीएम यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘एआय’ किंवा माणसांकडून ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असा स्पष्ट आक्षेप मस्क यांनी त्या वेळी घेतला होता. एवढेच नव्हे तर ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्याचा सल्लाही दिला होता, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

आता त्याच मस्क महाशयांना म्हणे भारतीय ईव्हीएम यंत्रांनी एका दिवसात 64 कोटी मते कशी मोजली, याबद्दल आश्चर्याचा धक्का बसला आहे! मस्क महाशयच कशाला? भारतातील विरोधी पक्षांसह लाखो सुज्ञ नागरिकही ईव्हीएम यंत्रांबद्दल अचंबित आहेत, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. (Maharashtra Election 2024: Thackeray group doubts on EVM regarding assembly result)

हेही वाचा – Supriya Sule on Mahayuti : निकालाच्या 72 तासानंतरही सरकार नाही; सुप्रिया सुळेंचा 2019 ची आठवण करुन देत महायुतीला टोला


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -