Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : असंख्य अनुत्तरित राजकीय प्रश्नांचे ‘उत्तर’..., ठाकरे गटाचा ईव्हीएमवर...

Maharashtra Election 2024 : असंख्य अनुत्तरित राजकीय प्रश्नांचे ‘उत्तर’…, ठाकरे गटाचा ईव्हीएमवर रोख

Subscribe

महाराष्ट्रात आणलेली ईव्हीएम आणि त्यांचे गुजरात-राजस्थान कनेक्शन, मतदान यंत्रे आणि त्यांच्या बॅटरी चार्जिंगबाबतचे गूढ, प्रत्यक्ष झालेले मतदान आणि ईव्हीएममधून बाहेर आलेल्या मतांमधील तब्बल 95 मतदारसंघांमधील तफावत अशा रहस्यमय कथा ‘ईव्हीएम घोळ’ या संशयाला बळकटी देणाऱ्याच आहेत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

(Maharashtra Election 2024) मुंबई : चोविस तासांत 64 कोटी मते मोजणारी भारतीय ईव्हीएम हा अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांना पडलेला ‘प्रश्न’ आहे. पण भारतीय सुज्ञ नागरिकांसाठी मात्र ईव्हीएम हे मागील दहा वर्षांतील असंख्य अनुत्तरित राजकीय प्रश्नांचे ‘उत्तर’ आहे, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray group targets BJP regarding EVMs)

भारतीय ईव्हीएमने 24 तासांत 64 कोटी मते मोजली म्हणून अमेरिकेतील एलॉन मस्क हैराण आहेत तर, भारतीय जनता मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि घटक पक्षांच्या पारड्यात महाप्रचंड मत‘दान’ कसे झाले? विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 230 जागांचा ‘बंपर लकी ड्रॉ’ सत्ताधारी महायुतीला कसा लागला? या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे आणि त्यांचा तर्क ईव्हीएमजवळ येऊन थांबत आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : ईव्हीएम है तो मुमकीन है, विधानसभा निकालावरून ठाकरे गटाचा घणाघात

महाराष्ट्रात आणलेली ईव्हीएम आणि त्यांचे गुजरात-राजस्थान कनेक्शन, मतदान यंत्रे आणि त्यांच्या बॅटरी चार्जिंगबाबतचे गूढ, प्रत्यक्ष झालेले मतदान आणि ईव्हीएममधून बाहेर आलेल्या मतांमधील तब्बल 95 मतदारसंघांमधील तफावत अशा रहस्यमय कथा ‘ईव्हीएम घोळ’ या संशयाला बळकटी देणाऱ्याच आहेत, असे शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून म्हटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता चार दिवस झाले. मात्र त्यातील ‘ईव्हीएम’च्या ‘भूमिके’चे कवित्व संपायची चिन्हे नाहीत. विशेषतः, महाराष्ट्रात लागलेल्या निकालामधील ईव्हीएमचे ‘योगदान’ यावरून मोठ्या प्रमाणात वादंग, चर्चा, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून चार दिवस उलटूनही ईव्हीएमच्या ‘सुरस’ कथा चव्हाट्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपा सत्तेत असेपर्यंत या सुरस कथा आणि त्याबाबतचा संशयकल्लोळ सुरूच राहील. अमेरिकन मस्क महाशयांनी आता भारतीय ईव्हीएमच्या अति वेगवान मतमोजणीबद्दल अचंबा व्यक्त केला. भारतीय जनमानस मात्र त्याच ईव्हीएममधून फक्त सत्ताधाऱ्यांच्याच पारड्यात प्रचंड मते कशी पडतात, या करामतीमुळे स्तंभित आहे. केवळ मस्कच नव्हे, तर ईव्हीएमवरून सगळेच अचंबित आहेत, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. (Maharashtra Election 2024: Thackeray group targets BJP regarding EVMs)

हेही वाचा – Sanjay Raut : भाजपाला मिळालेले यश देशासाठी, राज्यासाठी घातक; राऊतांचा हल्लाबोल


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -