Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरMaharashtra Election 2024 : आता सुटका नाही, ठाकुरांचा विनोद तावडेंना इशारा

Maharashtra Election 2024 : आता सुटका नाही, ठाकुरांचा विनोद तावडेंना इशारा

Subscribe

हितेंद्र ठाकूर यांनी मी विनोद तावडे यांना एकांतात भेटणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे. तसेच, वसई रोड 5, वसई पश्चिम 4 असा त्या डायरीत उल्लेख आहे, अशी माहितीही ठाकूरांनी दिली.

विरार : भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटप करण्यासाठी आणले असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबतचे पुरावे देखील ठाकूर यांनी दिले असून त्यांनी विनोद तावडे यांच्याकडून डायरी जप्त करत त्यात अनेकांची नावे असल्याचा दावा केला आहे. ठाकूर यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकारणात खळबळ उडाली असून याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Maharashtra Election 2024 There is no escape now, Hitendra Thakur warning to Vinod Tawde)

याबाबत हितेंद्र ठाकूर यांनी प्रथम प्रतिक्रिया देत म्हटले की, मला याबाबतची माहिती भाजपाच्याच काही लोकांकडून देण्यात आली होती. मात्र, भाजपाचा राष्ट्रीय नेता असे काहीच करू शकत नाही याचा विचार सुरुवातीला केला. परंतु, ज्यावेळी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आज मंगळवारी (ता. 19 नोव्हेंबर) विवांत हॉटेलमध्ये पाठवले असता विनोद तावडे हे पैशांसोबत सापडले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे नालासोपारा उमेदवार राजन नाईक सुद्धा तिथे उपस्थित होते. तसेच विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन आले होते. त्यांच्यासोबत डायऱ्या देखील होत्या, असा दावा क्षितिज ठाकूर यांनी केला. विनोद तावडे यांच्याकडे डायऱ्या सापडल्या, त्यामध्ये 15 कोटींची नोंद असल्याचा क्षितिज ठाकूर यांनी आरोप केला आहे. सदर घटनेनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Hitendra Thakur : “तावडेंचे 25 फोन, माफ करा, मला जाऊद्या, मात्र…”, हितेंद्र ठाकूर आक्रमक

यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी मी विनोद तावडे यांना एकांतात भेटणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे. तसेच, वसई रोड 5, वसई पश्चिम 4 असा त्या डायरीत उल्लेख आहे. 4 वाजता कुठे पैसे पोहोचवायचे हे सर्व त्यात लिहिले आहे. विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर नियमानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अन्यथा उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यत ते माझ्यासोबतच इथे राहतील. मी त्यांना एकांतात भेटणार नाही. त्यांनी लोकांसमोर येऊन बोलावे, ते नेमके का आले? याची उत्तरे त्यांनी प्रसार माध्यमांना द्यावी, असे हितेंद्र ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच, पत्रकार जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची विनोद तावडेंनी उत्तरे द्यावी, असे यावेळी क्षितिज ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आले. पण यामधून आता विनोद तावडेंची सुटका नाही, असा इशाराच हितेंद्र ठाकूर यांच्याकडून देण्यात आला आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -