मुंबई : राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यामुळे राज्यातील शाळांना 18 ते 20 नोव्हेंबर असे सलग तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात यावी, यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता या प्रस्तावावर शासनाने उत्तर दिले आहे. (Three days off for schools due to elections.)
हेही वाचा : SS UBT Vs NCP : अजित पवार यांची सध्याची अवस्था पाहता… ठाकरे गटाचे शरसंधान
अनेक शिक्षकांना निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची कामे लावली जातात. त्यामुळे शाळांना सलग तीन दिवस सुट्टी जाहीर करावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र यावर आता शासनाने तो अंतिम निर्णय मुख्यध्यापकांच्या हाती सोपवला आहे. त्यामुळे 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत शाळा भरवणे शक्य नसल्यास मुख्याध्यापकांना त्यांच्या अखत्यारित शाळा बंद ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. अनेक शाळांमध्ये मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. अनेक शिक्षकांची नियुक्तीही त्यासाठी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर 18, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता. शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
हेही वाचा : Siddique Murder Case : काम झालं की नाही हे पाहण्यासाठी मी रुग्णालयाबाहेर…हत्या प्रकरणातील शूटर काय म्हणाला
शिक्षण आयुक्त कार्यालयाने शाळांना सुट्टीचा प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली असून, शाळांना सुट्टी द्यावी की नाही हे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना दिला आहेत. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक आपल्यानुसार आपल्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेऊ शकतात, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत शाळा भरवणे शक्य नसल्यास मुख्याध्यापकांना त्यांच्या अखत्यारित शाळा बंद ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. (Three days off for schools due to elections.)
Edited By Komal Pawar Govalkar