(Maharshtra Election 2024) मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी काल, बुधवारी मतदान झाले. सुरुवात संथ तर सायंकाळी पाच वाजता सरासरीच्या आसपास टक्केवारी पोहोचली. पण शेवटच्या टप्प्यात मतदान 65 टक्क्यांच्या पुढे गेले. एक-दोन अपवाद वगळता महायुतीच्या मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्येही मोठ्याप्रमाणावर मतदान नोंदवले गेले. त्यामुळे त्यांना याचा फायदा होईल की फटका बसेल, हे शनिवारीच स्पष्ट होईल. (Voter turnout increased in ministerial constituencies)
राज्यात बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के, 11 वाजता 18.97 टक्के, दुपारी 1 वाजेपर्येत 32.18 टक्के, 3 वाजता 45.53 आणि सायंकाळी 5 वाजता 58.22 टक्के मतदान नोंदवले गेले होते. त्यामुळे यावेळी 2019प्रमाणे 62 टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, मतदारांनी शेवटच्या टप्प्यात दाखवलेल्या उत्साहामुळे मतदानाची टक्केवारी 65 टक्क्यांच्या पुढे गेली.
हेही वाचा – Bacchu Kadu : “आम्ही सरकार स्थापन करू”; बच्चू कडूंनी सांगितलं सत्तेत येण्याचं ‘गणित’
मंत्र्यांच्या मतदारसंघांतही 2019च्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात 59.85 टक्के मतदान झाले. गेल्या 2019च्या निवडणुकीत तिथे 49.20 टक्के मतदान नोंदविले गेले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात 54.49 टक्के (2019मध्ये 50.02 टक्के) मतदान झाले. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात 2019मध्ये झालेल्या 68.82 टक्क्यांच्या तुलनेत यावेळी 71.03 टक्के मतदान नोंदवले गेले.
महायुतीचे अन्य मंत्री आणि मतदानाची टक्केवारी (कंसात 2019चे मतदान) –
- छगन भुजबळ, येवला – 74.05% (67.77%)
- राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी – 74.52% (71.00%)
- दिलीप वळसे पाटील, आंबेगाव – 72.42% (66.91%)
- सुधीर मुनगंटीवार, बल्लारपूर – 69.70% (62.53%)
- चंद्रकांत पाटील, कोथरुड – 52.18% (48.20%)
- विजयकुमार गावित, नंदुरबार – 64.54% (55.59%)
- धनंजय मुंडे, परळी – 72.00% (73.15%)
- हसन मुश्रीफ, कागल – 81.72% (81.42%)
- गिरीश महाजन, जामनेर – 69.74% (67.61%)
- गुलाबराव पाटील, जळगाव ग्रामीण – 66.67% (62.86%)
- धर्मरावबाबा आत्राम, अहेरी – 73.26% (70.36%)
- दादा भुसे, मालेगाव बाह्य – 67.54%, (59.70%)
- अदिती तटकरे, श्रीवर्धन – 60.90% (61.08%)
- संजय राठोड, दिग्रस – 67.00% (70.05%)
- सुरेश खाडे, मिरज – 65.60% (55.15%)
- उदय सामंत, रत्नागिरी – 63.00% (57.86%)
- तानाजी सावंत, परांडा – 64.80% (68.31%)
- रवींद्र चव्हाण, डोंबिवली – 56.19% (40.82%)
- अब्दुल सत्तार, सिल्लोड – 80.00% (75.28%)
- दीपक केसरकर, सावंतवाडी – 68.00% (63.91%)
- संजय बनसोडे, उदगीर – 67.11% (60.21%)
- अतुल सावे, औरंगाबाद पूर्व – 60.63% (61.23%)
- शंभूराज देसाई, पाटण – 73.25%७ (68.00%)
- मंगलप्रभात लोढा, मलबार हिल – 52.53% (46.99%)
- अनिल पाटील, अमळनेर – 65.81% (63.01%)
हेही वाचा – Hasan Mushrif : कॉलर उडवली, शड्डू ठोकला अन्…; निकालाआधी मुश्रीफांना भलताच ‘कॉन्फिडन्स’