Homeमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : या पाच जिल्ह्यात नारीशक्तीचे मत ठरणार विशेष

Maharashtra Election 2024 : या पाच जिल्ह्यात नारीशक्तीचे मत ठरणार विशेष

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील 288 मतदारसंघातील सुमारे 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच यामध्ये ठराविक पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई : सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील 288 मतदारसंघातील सुमारे 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच ठराविक पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून आले आहे. (Women will be kingmakers in five districts.)

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : राज्यात 4,140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, पण मविआ अन् युतीला बंडखोरांचे टेंशन

राज्यभरात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. मतदार आपले मतदान योग्य व्यक्तीला देऊन त्या व्यक्तीला निवडून देण्यासाठी सज्ज देखील झाला आहे. आगामी विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. राज्यातील एकूण 288 मतदारसंघातील सुमारे 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार मतदानाचा हक्क यावेळी बजावणार आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिकची असल्याचे दिसून आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण मतदार संख्या 13 लाख 39 हजार 697 असून यामध्ये 11 तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार 6 लाख 46 हजार 176 आणि महिला मतदार 6 लाख 96 हजार 510 आहेत. नंदुरबारमध्ये एकूण मतदार 13 लाख 21 हजार 642 असून यामध्ये 13 तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार 6 लाख 54 हजार 412 आणि महिला मतदार 6 लाख 67 हजार 217 आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण मतदार 11 लाख 25 हजार 100 असून यामध्ये 10 तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 53 हजार 685 आणि महिला मतदार 5 लाख 71 हजार 405 आहेत. भंडारा येथे एकूण मतदार 10 लाख 16 हजार 870 असून यामध्ये 4 तृतीयपंथींची नोंद आहे; पुरुष मतदार 5 लाख 6 हजार 974 आणि महिला मतदार 5 लाख 9 हजार 892 आहेत. सिंधुदुर्गात एकूण मतदार 6 लाख 78 हजार 928 असून यामध्ये 3 तृतीयपंथींची नोंद आहे. पुरुष मतदार 3 लाख 36 हजार 991 आणि महिला मतदार 3 लाख 41 हजार 934 आहेत. अशाप्रकारे या जिल्ह्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची मतदानाची संख्या अधिकची असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : लोकशाही चेंगरून कोसळणार नाही ना! ठाकरे गटाला भीती

रत्नागिरीमध्ये पाच मतदारसंघ, नंदुरबारमध्ये चार मतदारसंघ, गोंदियामध्ये चार मतदारसंघ, भंडारा येथे तीन मतदारसंघ आणि सिंधुदुर्गात तीन मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांमधील एकूण 19 विधानसभा मतदारसंघांमध्ये नारीशक्ती ही आपला आमदार निवडण्यासाठी किंगमेकर ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. तसेच महिलांचा सत्तेमधील वाटा पाहिला तर गेल्या निवडणुकीमध्ये राज्यातून 24 महिला विधानसभेवर निवडून आल्या होत्या.

तसेच अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये 30 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. सोलापूरमध्ये 38 लाख 48 हजार 869, अहमदनगरमध्ये 37 लाख 83 हजार 987, जळगावमध्ये 36 लाख 78 हजार 112, कोल्हापूरमध्ये 33 लाख 5 हजार 98 आणि औरंगाबादमध्ये 32 लाख 2 हजार 751 मतदार आहेत. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या 10 जिल्ह्यांमध्ये 20 लाखांहून जास्तीचे मतदार आहेत.


Edited By Komal Pawar Govalkar