Maharashtra exit poll live : पाच वर्षांमधील सकाळचा शपथविधी सरकार आणि पक्ष फोडाफोडीच्या घटनेनंतर अखेर विधानसभा निवडणूक पार पडली आहे. एकूण सहा प्रमुख पक्ष निवडणुकीला सामोरे गेले. महायुती आणि महाविकास आघाडीनं निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. 23 तारखेला मतमोजणी होणार असून महायुती की महाविकास आघाडी सत्तेत येणार, हे स्पष्ट होणार आहे. मात्र, ‘चाणक्य’चा एक्झिट पोल समोर आला आहे. यात महायुती वरचढ दिसत आहे.
‘चाणक्य’च्या एक्झिट पोलनुसार महायुती पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महायुतीला 152 ते 160 जागा मिळू शकतात. तर, महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळेल. अपक्षांना 6 ते 8 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे.
हेही वाचा : नितेश कराळे मास्तरांना मारहाण, भाजप नेत्यावर आरोप; पत्नीचाही गळा धरला अन्…
2019 च्या निवडणुकीत 105 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यंदाच्या निवडणुकीतही भाजप मोठा पक्ष ठरू शकतो. मात्र, भाजपच्या जागेत घट होताना दिसत आहे. भाजपला 90 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर, शिंदे गटाला 48 जागा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 22 जागा मिळताना दिसत आहेत. महायुतीसोबत असलेल्या सहयोगी पक्षांना 2 जागा जागा मिळू शकतात.
लोकसभेनंतर विधानसभेतही महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. काँग्रेसला 63, ठाकरेंच्या शिवसेनेला 35 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 40 जागा मिळण्याची शक्यता ‘चाणक्य’ने वर्तवली आहे.
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, ‘एमआयएम’ आणि महाशक्त परिवर्तनला 6 ते 8 जागा मिळू शकतात, असा अंदाज ‘चाणक्य’ने वर्तवला आहे.
हेही वाचा : पत्रकाराच्या प्रश्नावर अजितदादांनी दाखवलं मिडल फिंगर अन् करंगळी; म्हणाले, “अरे वेड्यांनो…”