मुंबई : महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आता सगळ्यांची नजर ही एक्झिट पोलवर आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात कोणाचे सरकार येईल याचा ढोबळमानाने अंदाज येतो. (maharashtra election exit polls result 2024 mahayuti mva bjp congress shiv sena seats)
राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. आता 23 नोव्हेंबर रोजी याचे निकाल लागणार आहेत. आता मॅट्रिझचा एक्झिट पोल समोर आला असून, त्यानुसार महायुतीचेच पुन्हा सरकार येणार आहे. महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्षांना आठ ते दहा जागा मिळतील.
हेही वाचा – Maharashtra Exit Poll : महायुती की महाविकास आघाडी, कोण येणार सत्तेत? ‘चाणक्य’चा मोठा एक्झिट पोल समोर
कोणत्या पक्षाला किती जागा?
मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला 89 ते 101 जागा मिळू शकतात. शिवसेना – शिंदे गटाला 37 ते 45 जागा मिळतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 17 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा विचार करायचा तर कॉंग्रेसला 39 ते 47, शिवसेना – ठाकरे गट 21 ते 29 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 35 ते 43 जागा मिळतील. एक्झिट पोलच्या या अंदाजानुसार राज्यात कोणाचे सरकार येईल, याचा कल स्पष्ट होतो आहे.
महाराष्ट्रात यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या दरम्यान थेट मुकाबला आहे. यावेळी पहिल्यांदाच शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षात फूट पडली आहे.
किती जागांवर कोण लढवणार निवडणूक
महाराष्ट्रात 149 जागांवर भाजप निवडणूक लढवते आहे. शिंदेंची शिवसेना 81 तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 59 जागांवर निवडणूक लढते आहे. तर कॉंग्रेस 101, उद्धव ठाकरे यांची शिवसेना 95 तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 86 जागा लढवते आहे. शिवसेनेचे दोन्ही गट परस्परांसमोर 50 जागा लढवत आहेत. तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट परस्परांविरुद्ध 37 जागा लढवत आहेत. (maharashtra election exit polls result 2024 mahayuti mva bjp congress shiv sena seats)
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : जनता पॉझिटिव्ह कामच निवडणार, मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Edited by : Ashwini A. Bhatavdekar