Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Result 2024 : या विद्यमान आमदारांनी चाखली पराभवाची चव

Maharashtra Election Result 2024 : या विद्यमान आमदारांनी चाखली पराभवाची चव

Subscribe

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. राज्यात अनेक बड्या नेत्यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये फक्त महाविकास आघाडीच नव्हे तर महायुतीच्या नेत्यांचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत तब्बल 250 आमदारांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांना पुन्हा विधानसभेत निवडून देण्यास मतदारांनी नापसंती दर्शवली. त्यांच्यापैकी तब्बल 65 विद्यमान आमदारांना पराभवाची चाव चाखावी लागली. तसेच, चक्क 6 आमदारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. (Maharashtra Election Result 2024 65 mls lost in this term)

हेही वाचा : Waqf Board Amendment Bill : वक्फ मालमत्ता बळकावण्यासाठी…; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे गंभीर आरोप 

- Advertisement -

यंदाच्या निवडणुकीत तब्बल 250 विद्यमान आमदार हे विधानसभेच्या रिंगणात होते. त्यांच्यापैकी 185 आमदार हे पुन्हा एकदा विधानसभेत दिसणार असून तब्बल 65 आमदारांना पराभवाची चाव चाखावी लागली आहे. गेल्या निवडणुकीत पसंती दिलेल्या आमदारांना मतदारांनी यंदा मात्र पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून दिले नाही. तर, तब्बल 6 आमदारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. या पराभूत आमदारांच्या यादीत काँग्रेसचे 19, भाजपच्या 5 आमदारांना नापसंती दर्शविली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 10 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकूण 8 आमदारांना मतदारांनी पुन्हा निवडून दिले नाही.

तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे 6 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 7 आमदारांचा या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याचे समोर आले. तसेच, बहुजन विकास आघाडीचे 3, प्रहारचे 2, एमआयएम आणि मनसेच्या प्रत्येकी एक आणि तीन अपक्ष आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या निवडणुकीच्या निकालात या आमदारांना पुन्हा निवडून देण्यास मतदारांनी जास्त रस दाखवला नाही. या यादीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक 20 विद्यमान आमदार विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

- Advertisement -

ही आहेत डिपॉझिट जप्त झालेल्या आमदारांची नावे

पराभव झालेल्या आमदारांच्या यादीतील तब्बल 6 आमदारांचे तर डिपॉझिटही जप्त करण्यात आले आहे. या आमदारांना एकूण मतांपैकी 16 टक्के मतेही मिळवता आली नाहीत.

मीरा-भाईंदर : गीता जैन
मानखुर्द – नवाब मलिक
मेळघाट – राजकुमार पटेल
मोर्शी – देवेंद्र भुयार
गेवराई – लक्ष्मण पवार
आष्टी – बाळासाहेब आजबे

मुंबईतील धक्कादायक निकाल

वर्सोवा – भारती लवेकर
भायखळा – यामिनी जाधव
माहिम – सदा सरवणकर
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दिकी
चेंबूर – प्रकाश फातर्पेकर
अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
भांडुप – रमेश कोरगांवकर

राज्यात या दिग्गजांचा पराभव

तिवसा – यशोमती ठाकूर (काँग्रेस)
संगमनेर – बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
अचलपूर – बच्चू कडू (प्रहार जनशक्ती)
वसई – हितेंद्र ठाकूर (बविआ)
नालासोपारा – क्षितिज ठाकूर (बविआ)
राजापूर – राजन साळवी (शिवसेना उबाठा)
घनसांगवी – राजेश टोपे (राष्ट्रवादी शरद पवार)
कसबा पेठ – रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
कल्याण ग्रामीण – प्रमोद पाटील (मनसे)
कुडाळ – वैभव नाईक (शिवसेना उबाठा)
लातूर ग्रामीण – धीरज देशमुख (काँग्रेस)
सांगोले – शहाजीबापू पाटील (शिवसेना)


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -