Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रकोकणMaharashtra Election Result 2024 : सिंधुदुर्गात महायुतीचे तिन्ही उमेदवार आघाडीवर

Maharashtra Election Result 2024 : सिंधुदुर्गात महायुतीचे तिन्ही उमेदवार आघाडीवर

Subscribe

सिंधुदुर्गामध्ये महायुतीचे तिन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे यंदा सिंधुदुर्गात महायुतीचे पारडं जड दिसत असून विजयाची शक्यता अधिक आहे.

सिंधुदुर्ग : आज राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. संध्याकाळपर्यंत राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात नक्की कोणाची सत्ता येईल आणि कोण विरोधात असेल हे लवकरच समोर येणार आहे. त्यातच कोकणातील सिंधुदुर्गामध्ये चित्र सकाळपासून स्पष्ट दिसत आहे. सिंधुदुर्गामध्ये महायुतीचे तिन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे यंदा सिंधुदुर्गात महायुतीचे पारडं जड दिसत असून विजयाची शक्यता अधिक आहे. (All three Mahayuti candidates are leading in Sindhudurg.)

हेही वाचा :  भाजपचे संकटमोचक आघाडीवर, गिरीश महाजन सातव्यांदा विजयाकडे वाटचाल

- Advertisement -

सिंधुदुर्गात एकूण तीन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. त्यामध्ये कणकवलीमधून भाजपाचे नितेश राणे आघाडीवर आहेत. कुडाळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे आघाडीवर आहेत तर सावंतवाडीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये कोकणाचा कौल हा महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच त्यामुळे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकणपट्ट्यात जनमताचा कौल कुणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

हेही वाचा :  Pravin Darekar : फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील; प्राथमिक कलांनंतर दरेकरांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांचे कल हाती आले असून निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटनुसार भाजपा हा मोठा पक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण साधारणतः 9.30 वाजेपर्यंत भाजपाचे 75 उमेदवार आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 28 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे सध्या महायुती एकूण 145 जागांवर म्हणजेच बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महायुतीची ही आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून केवळ 55 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व निकालांचे चित्र आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. (All three Mahayuti candidates are leading in Sindhudurg.)


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -