Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Result 2024 : भाजपचा चढता आलेख, अन् मविआची घसरण

Maharashtra Election Result 2024 : भाजपचा चढता आलेख, अन् मविआची घसरण

Subscribe

2019 मध्ये भाजपने शिवसेनेसोबत युती असताना 105 जागांवर विजय मिळवत मोठा पक्ष ठरला होता. पण तरीही यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या स्ट्राईक रेटमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले. तेच दुसरीकडे विजयाची अपेक्षा असताना महाविकास आघाडीला या निवडणुकीत चांगलाच फटका बसल्याचे समोर आले.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीच्या त्सुनामीचा महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला. यावेळी भाजप हा सर्वाधिक जागा जिंकत भाऊ ठरला तर महाविकास आघाडीला या निवडणुकीत चांगलाच फटका बसला. लोकसभेमध्ये महायुतीच्या जागा कमी आल्या होत्या. तर, महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला फटका बसेल आणि महाविकास आघाडीला फायदा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण, शनिवारी (23 नोव्हेंबर) निकाल समोर आल्यानंतर अशा सर्व चर्चा धुळीत मिळाल्या. कारण, महायुतीने 200 हून अधिक जागांवर विजय मिळवत मोठे यश प्राप्त केले. (Maharashtra Election Result 2024 BJP strike rate increased and MVA)

हेही वाचा : Election Result 2024 : महायुतीचा विजय, पण निकालाविरोधात सरोदे न्यायालयात मागणार दाद 

- Advertisement -

यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. तर, शिवसेना शिंदे गटाने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळवला. तर, काँग्रेसला या निवडणुकीत 20 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला 20 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागांवर विजय मिळाला. अशा पद्धतीने महायुतीने तब्बल 230 जागांवर विजय मिळवत बहुमताचा 145 आकडा सहज गाठला. तर, या निवडणुकीत संपूर्ण महाविकास आघाडीने जेमतेम 50 जागांवर विजय मिळवला.

भाजप आणि काँग्रेसची कामगिरी

2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी 105 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी त्यांचा स्ट्राईक रेट हा सुमारे 64 टक्के होता. तर, यावेळी काँग्रेसने 147 जागा लढवल्या होत्या. पण यावेळी फक्त 44 जागांवर त्यांना विजय मिळवला होता. यावेळी त्यांचा स्ट्राईक रेट हा अंदाजे 30 टक्क्यांच्या आसपास होता. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये वाढ तर झालीच पण त्यांच्या स्ट्राईक रेटमध्ये मोठा फरक दिसून आला. कारण, यंदाच्या निवडणुकीत भाजपने 149 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर, यापैकी 132 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. यावेळी त्यांचा स्ट्राईक रेट हा 88 टक्के आहे. तेच काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत 101 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, पण त्यांचा फक्त 16 जागांवरच विजय झाला. यावेळी त्यांचा स्ट्राईक रेट हा जेमतेम 15 ते 16 टक्क्यांच्या आसपास होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपचा आलेख हा चढता दिसला तर काँग्रेसचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

घटक पक्षांची टक्केवारी

दरम्यान, महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने 81 जागा लढवल्या होत्या. यापैकी त्यांनी 57 जागांवर विजय मिळवला. यावेळी त्यांचा स्ट्राईक रेट हा 70 टक्के होता. तर, तेच दुसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 59 जागा लढवल्या, त्यांपैकी 41 जागांवर विजय मिळावा. त्यांचाही स्ट्राईक रेट हा 69 टक्के होता. दुसरीकडे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने यंदाच्या निवडणुकीत 95 जागांवर उमेदवार दिले होते. या जागांपैकी 20 जागांवर विजय मिळवला. यावेळी त्यांच्या स्ट्राईक रेट हा 21 टक्के होता. तर तेच राष्ट्रवादी शरद पवार गटाने 86 पैकी फक्त 11 जागांवर विजय मिळवला. महत्त्वाच्या 6 पक्षांमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट हा सर्वात कमी म्हणजे फक्त 11 टक्के होता. त्यामुळे महायुतीने या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा दणका दिल्याचे दिसून आले.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -