Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Result 2024 : राज्यातील या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का; मतदारांनी...

Maharashtra Election Result 2024 : राज्यातील या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का; मतदारांनी बसवले घरी

Subscribe

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. आणि अनेक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आश्चर्याचे अनेक धक्के बसले आहेत. यात सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झालेले दिसतायत.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. आणि अनेक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आश्चर्याचे अनेक धक्के बसले आहेत. यात सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झालेले दिसतायत. यात बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, रवींद्र धंगेकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपूत्र धीरज देशमुख, यांच्यासह अन्य पक्षीयांच्या नेत्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. (maharashtra election result 2024 congress leader former chief minister prithviraj chavan senior leader balasaheb thorat defeated)

या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. संगमनेर या त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातून बाळासाहेब थोरात पराभूत झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी आत्तापर्यंत आठवेळा निवडणूक लढवली आणि ते एकदाही हरले नव्हते. मात्र आता नवव्या वेळी त्यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी थोरातांचा 10 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला आहे. काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जातो आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : राज्यातील या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का; मतदारांनी बसवले घरी

यासोबतच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपाचे डॉ. अतुलबाबा भोसले हे या मतदारसंघातून विजयी ठरले आहेत. याआधी 2014 आणि 2019 मध्ये चव्हाणांनी निसटता विजय प्राप्त केला होता. 2019 साली भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांच्याविरोधात सहा हजारांच्या मताधिक्याने पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते. तर 2014 मध्ये काँग्रेसचे बंडखोर नेते विलास पाटील-उंडाळकर यांचा चव्हाण यांच्याविरोधात 16 हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी पाटील उंडाळकर आणि चव्हाण एकत्र आले. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना विजयाची खात्री वाटत होती. परंतु, त्यांचा पराभव झाला आहे.

- Advertisement -

बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, काँग्रेससह महाविकास आघाडीला 180 जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मात्र हे म्हणणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास ते मुख्यमंत्रिपदाचेही प्रमुख दावेदार मानले जात होते. शांत आणि संयमी नेते पण राजकारणात मुत्सदीगिरी करणारे नेते अशी त्यांची ओळख होती. मात्र बाळासाहेब थोरात या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे. तिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा देखील जवळपास 10 हजार मतांनी पराभव झाला आहे. हे निकाल अतिशय धक्कादायक असल्याच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.

एरवी कायम भाजपासोबत असलेल्या बच्चू कडू आणि राज्यात 2022 मध्ये झालेल्या बंडानंतर एकनाथ शिंदेंसोबत कडू देखील गुवाहटीला गेले होते. असे असतानाही या निवडणुकीत विद्यमान महायुती सरकारच्या धोरणांवर टीका करत बच्चू कडूंनी महायुतीची साथ सोडली आणि प्रहार पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा 12 हजार मतांनी पराभव केला. अचलपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -