Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Result 2024 : मुंबईतील धक्कादायक निकाल, दिग्गजांना मतदारांनी बसवले घरी

Maharashtra Election Result 2024 : मुंबईतील धक्कादायक निकाल, दिग्गजांना मतदारांनी बसवले घरी

Subscribe

राज्यातील काही मतदारसंघांसोबतच मुंबईतही धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. मुंबईतील मालाड पश्चिम, वर्सोवा, भायखळा, शिवडी, वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये धक्कादायक निकाल लागल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. महायुतीने राज्यात अनपेक्षित असे यश मिळवत महाविकास आघाडीला भुईसपाट केले आहे. कारण या निकालानंतर विधानसभेमध्ये आता कदाचित विरोधी पक्षनेताही बसला जाणार नाही, असेच चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. पण अशातच आता राज्यातील काही मतदारसंघांसोबतच मुंबईतही धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. मुंबईतील मालाड पश्चिम, वर्सोवा, भायखळा, शिवडी, वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये धक्कादायक निकाल लागल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra Election Result 2024 Shocking results in Mumbai, veterans were sent home by voters)

मुंबईतील भायखळा विधानसभेत शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांचा पराभव झाला असून या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे मनोज जामसूतकर विजयी झाले आहेत. त्याशिवाय शिवडी विधानसभेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचा अजय चौधरी यांनी पराभव केला असून ते तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. मालाड पश्चिम विधानसभेतही 2009 पासून सलग आमदार राहिलेले अस्लम शेखही पिछाडीवर पाहायला मिळत असून यावेळी त्यांचा पराभव निश्चित असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे वर्सोवा विधानसभेतून दोन टर्म म्हणजेच तब्बल 10 वर्ष आमदार राहिलेल्या भारती लव्हेकर यांना पराभवाचा धक्का बसला असून शिवसेना ठाकरे गटाचे हारून खान या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील काही निकालांनी अनेकांची झोप उडवल्याचे पाहायला मिळत आहेत. परंतु, मुंबईतील या निकालांमुळे शिवसेना ठाकरे गटाला मुंबईकरांनी नाकारल्याचे मत आता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Aaditya Thackeray : वरळीत विजय पण…; राज्यातील निकालावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया…

मुंबईतील महत्त्वाच्या मतदासंघांमध्ये अणुशक्तीनगर आणि मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचीही चर्चा केली जात होती. यांतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सना मलिक यांचा विजय झाला असून त्यांनी राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फहाद अहमद यांचा पराभव केला आहे. पण सना मलिक या विजयी झालेल्या असलेल्या तरी दुसरीकडे मात्र, सना यांचे वडिल आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. मानखूर्द शिवाजीनगर या मतदारसंघातील सपाचे विद्यमान आमदार अबू आझमी आपला गड राखण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्याकडूनच मलिकांचा पराभव झाला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -