नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आता लवकरच समोर येणार असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विदर्भातील अनेक दिग्गज नेत्यांच्या लढतीत कोणत्या मतदारसंघात कोणाचे वर्चस्व असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्राथमिक कलांनुसार, सध्या तरी विदर्भात महायुतीची सरशी असल्याचे समोर आले. राजकीय गणितामध्ये असा म्हंटले जाते की, विदर्भात मतदारराजा ज्यांच्या सोबत जातो, राज्यातदेखील त्यांचीच सत्ता येते. त्यामुळे विदर्भामध्ये महायुती की महाविकास आघाडी? कोणाला पसंती देणार? याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Election Result 2024 Vidarbha trends after first two to three rounds)
हेही वाचा : Maharashtra Election Results 2024 : मतमोजणीच्या दोन तासांत महायुती 200 पार, मविआ 70च्या आत
प्राथमिक कलांनुसार, विदर्भातात 46 जागांवर महायुतीला आघाडी आहे. तर, 14 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे विदर्भात महायुतीचे वर्चस्व कायम असल्याचे समोर आले आहे. अमरावतीमध्ये दोन धक्कादायक निकाल समोर आले आहेत. एकीकडे यशोमती ठाकूर या 630 मतांनी पिछाडीवर असल्याचे समोर आले. तर, दुसरीकडे अपक्षांची सत्ता येणार असे विधान करणारे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. तिसऱ्या फेरीमध्ये बच्चू कडू यांना मागे टाकत भाजपचे प्रवीण तायडे आघाडीवर होते. तसेच, गोंदियामध्ये भाजपचे विनोद अग्रवाल आघाडीवर असल्याचे समोर आले होते.
दरम्यान, बडनेरामध्ये युवा स्वाभिमानचे रवी राणा 11,304 मतांनी आघाडीवर होते. तर, धामणगावमध्ये भाजपचे प्रताप अडसड हे सहाव्या फेरीनंतर 3879 मतांनी आघाडीवर होते. तर, दर्यापूरमध्ये पाचव्या फेरीनंतर ठाकरे गटाचे गजानन लवटे 4885 मतांनी आघाडीवर होते. तर, तिवसामध्ये भाजपचे राजेश वानखेडे 783 मतांनी आघाडीवर होते.
सविस्तर वृत्त लवकरच…