Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रMaharashtra Election Results 2024 : चंदगड विधानसभेत भाजपाकडून अजित पवारांचा गेम? काय...

Maharashtra Election Results 2024 : चंदगड विधानसभेत भाजपाकडून अजित पवारांचा गेम? काय घडलंय नेमकं…

Subscribe

चंदगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. पण शिवाजी पाटलांमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव झाला आहे.

मुंबई : राज्यात महायुती सरकारला महाविजय मिळविण्यात यश मिळाले आहे. 288 जागापैकी महायुतीने राज्यात तब्बल 230 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण काही नवनिर्वाचित आमदार असेही आहेत, ज्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. पण भाजपाला पाठिंबा दिलेल्या एका अपक्ष आमदारामुळे अजित पवारांच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. चंदगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. पण शिवाजी पाटलांमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव झाला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Maharashtra Election Results 2024 Ajit Pawar getting shock from BJP in Chandgad Assembly)

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी, 23 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रालाच नाही तर देशाला अनपेक्षित असा निकाल लागला. सायंकाळी 05 वाजेपर्यंत महायुतीची सत्ता येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच तत्काळ राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेनंतर हे तिन्ही नेते बाहेर निघत असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानात “अजून एक आमदार आला… शिवाजी पाटील…” असे म्हटले. ज्यानंतर शिंदेंनीही शिवाजी पाटील असे हसत हसत म्हटले. ज्यामुळे फडणवीसांनी डोक्यावर हात मारून घेतला.

हेही वाचा… Deepak Kesarkar : नवा CM कोण होणार? शिंदे मुख्यमंत्रिपदावरून नाराज? केसरकरांनी सगळंच क्लिअर सांगून टाकलं…

शिवाजी पाटील हे निवडून आल्याचे कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अजित पवार यांनी “अरे काय हसताय तुम्ही?”असे म्हटले. तर “माझा माणूस पडला तिकडे” सांगत अजित पवारही हसू लागले. ज्यानंतर तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला. कारण चंदगड विधानसभा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच शिवाजी पाटील हे चंदगड विधानसभेतून लढण्यास इच्छुक होते. परंतु, महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपाचा एक भाग म्हणून, राष्ट्रवादीने या मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केला. शिवाजी पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपानेच तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गेम तर नाही ना केला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी कौल स्पष्ट होताच आपल्या गळ्यात भाजपाचा मफलर घालूनच मतमोजणी केंद्रावर उपस्थिती लावली होती. त्यामुळे ते भाजपासोबतच जाणार यामध्ये काहीच शंका नव्हती. विजयानंतर त्यांनी मतमोजणी केंद्रावरच भाजपा हा माझा श्वास आहे. त्याला सोडून मी काहीच करू शकत नाही, असे स्पष्ट केले होते. शिवाजी पाटील यांनी अजित पवार गटाचे उमेदवार राजेश पाटील यांचा 24 हजार 134 मतांनी पराभव केला. त्यामुळे जर का शिवाजी पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले नसते तर अजित पवारांना आणखी एका जागेवर सहज विजय मिळवता आला असता.


Edited By Poonam Khadtale