Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Results 2024 : अरेच्चा, उमेदवाराचे डिपॉझिट जप्त; म्हणजे नेमके काय...

Maharashtra Election Results 2024 : अरेच्चा, उमेदवाराचे डिपॉझिट जप्त; म्हणजे नेमके काय झाले?

Subscribe

लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो... ही निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीला एक ठराविक रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. त्यालाच डिपॉझिट असे म्हणतात.

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आज शनिवारी (ता. 23 नोव्हेंबर) मतमोजणी करण्यात येणार आहे. ज्यानंतर राज्यात आहे त्यांचीच सत्ता राहणार की नवीन सत्ताधारी येणार की अजून काही वेगळी राजकीय समीकरणे पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण हे सर्व काही सुरू असतानाच आता उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे, हे देखील ऐकायला मिळणार आहे. पण हे डिपॉझिट जप्त होणे म्हणजे काय? यामध्ये नेमके किती डिपॉझिट म्हणजे किती पैसे जप्त होतात? यामागचे नेमके कारण काय असते? हे आता पाहूयात… (Maharashtra Election Results 2024 Candidate deposit is confiscated, what exactly happens?)

लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो… ही निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीला एक ठराविक रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 नुसार ही रक्कम जमा करावी लागते, यालाच डिपॉझिट असे म्हणतात. महत्त्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ही रक्कम वेगवेगळी असते. अगदी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला सुद्धा डिपॉझिट भरावे लागते. त्यामुळे 1951 च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभे राहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 15 हजार रुपयांची रक्कम भरावी लागते. यामध्ये प्रवर्गानुसार कोणतीही सूट दिली जात नाही.

- Advertisement -

हेही वाचा… Maharashtra Election 2024 Result : महायुती-मविआचा आज फैसला; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

तसेच, लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीत उभे राहण्यासाठी निवडणूक आयोगाकडे 25 हजार रुपये जमा करावे लागतात. एसटी आणि एससी श्रेणीमधील उमेदवारांसाठी ही रक्कम 12 हजार 500 रुपये इतकी आहे. तर, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करताना 10 हजार रुपये डिपॉझिट म्हणून भरावे लागतात. प्रवर्गासाठी ही रक्कम 5 हजार इतकी आहे. त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी उमेदवारांना ते लढत असलेल्या निवडणुकीप्रमाणे रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

डिपॉझिट कधी जप्त होते?

केंद्रीय निवडणूक आयोग उमेदवारांकडून डिपॉझिट घेऊन ती रक्कम जमा करून घेतो. त्यानंतर ठराविक प्रमाणात मतं न मिळाल्यास डिपॉझिट जप्त होते. म्हणजेच भरलेली रक्कम परत केली जात नाही. प्रत्येक एकूण मतदानाच्या 16.66 टक्के मतं मिळवणे आवश्यक असते. पण असे न झाल्यास डिपॉझिट जप्त केले जाते. म्हणजेच 1 लाख मतदारांचा मतदारसंघ असेल तर उमेदवाराला 16 हजार 660 किंवा त्याहून अधिक मतं मिळाली तरच त्यांना डिपॉझिट परत केले जाते. तसे न झाल्यास त्यांना भरलेले पैसे परत मिळत नाहीत. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये किमान 1/6 मते मिळवणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त होत नाही. याउलट 1/6 टक्के मतं मिळवणाऱ्या उमेदवाराला डिपॉझिटची रक्कम परत केली जाते. तसेच विजेत्या उमेदवारालाही त्याच्या डिपॉझिटची रक्कम परत केली जाते. तसेच अर्ज मागे घेणाऱ्यांनाही त्यांनी भरलेली रक्कम परत केली जाते.

हेही वाचा… Maharashtra Marathwada Result 2024 : मराठवाड्यात जरांगे, जात आणि शेती फॅक्टर ठरणार परिणामकारक; पोस्टल मतांची मोजणी सुरु


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -