Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रकोकणMaharashtra Election Results 2024 : महायुतीचे कोकण समन्वयक अनिकेत पटवर्धनांचे फडणवीसांकडून अभिनंदन

Maharashtra Election Results 2024 : महायुतीचे कोकण समन्वयक अनिकेत पटवर्धनांचे फडणवीसांकडून अभिनंदन

Subscribe

महायुती अभेद्य ठेवणे तसेच भाजपा कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्याबरोबर अनिकेत पटवर्धन यांनी, महायुती म्हणून मतदान करण्याच्या दृष्टीने संपूर्ण ताकद आणि व्यूहरचना आखली. आधी लोकसभा आणि आता विधानसभेत मिळालेल्या यशामध्ये अनिकेत पटवर्धन यांनी अतिशय संयमी आणि उत्तम भूमिका बजावली. त्याची नोंद पक्षीय पातळीवर घेण्यात आली आहे.

(Maharashtra Election Results 2024) रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि कोकणातील महायुतीचे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला येथे भेट घेतली. महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन करून मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. तर, फडणवीस यांनीही अनिकेत पटवर्धन यांचे अभिनंदन केले. (Fadnavis congratulated Mahayuti Coordinator Aniket Patwardhan)

रत्नागिरीतील युवा नेते तसेच मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांनी फडणवीस यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने 230 जागा जिंकून प्रचंड यश मिळवले. तथापि, अनिकेत पटवर्धन यांनी पडद्याआड राहून सूत्रे हलवली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, भिवंडी जिल्ह्याचे महायुतीचे समन्वयक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. कोकणामध्ये महायुती टिकवण्यासाठी महायुतीचा समन्वयक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि चिपळूण या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होण्यामागे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांचा सिंहाचा आणि मोलाचा वाटा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : सत्ता तर पुन्हा आली, मुख्यमंत्री कोण? फडणवीस की भाजपाचा नवा चेहरा?

महायुती अभेद्य ठेवणे तसेच भाजपा कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्याबरोबर अनिकेत पटवर्धन यांनी, महायुती म्हणून मतदान करण्याच्या दृष्टीने संपूर्ण ताकद आणि व्यूहरचना आखली. आधी लोकसभा आणि आता विधानसभेत मिळालेल्या यशामध्ये अनिकेत पटवर्धन यांनी अतिशय संयमी आणि उत्तम भूमिका बजावली. त्याची नोंद पक्षीय पातळीवर घेण्यात आली आहे.

- Advertisement -

पडद्यामागे राहून भारतीय जनता पार्टी एकसंधपणे टिकण्यासाठी आणि सगळ्या नेत्यांना एकत्रित ठेवणे तसेच कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर फोनवर संपर्क साधून देणे. त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांच्या विविध ठिकाणी भेटीगाठी करून देणे ही जबाबदारी त्यांनी उत्तमपणे पार पाडली. अनिकेत पटवर्धन यांचे केंद्रीय नेतृत्वाशी तसेच राज्यातील नेत्यांशी सौहार्दाचे संबंध आहेत. प्रसिद्धीची अपेक्षा नाही, कोणताही बडेजाव न करता पडद्याच्या मागे राहून शांतपणे, संयमीपणे सगळे काम कशा पद्धतीने करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून अनिकेत पटवर्धन यांच्याकडे पाहिले जाते. (Maharashtra Election Results 2024 : Fadnavis congratulated Mahayuti Coordinator Aniket Patwardhan)

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : सत्ता तर पुन्हा आली, मुख्यमंत्री कोण? फडणवीस की भाजपाचा नवा चेहरा?


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -