(Maharashtra Election Results 2024) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या सुमारे तीन तासांच्या कलानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असे चित्र आहे. त्यातही भाजपाला रेकॉर्ड ब्रेक जागा मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बाजूला राहून सत्तेची सूत्रे हाती ठेवणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर विराजमन होतील. (Mahayuti’s strong lead, MVA’s big defeat)
पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. तब्बल 30 वर्षानंतर राज्यात विधानसभेसाठी सर्वाधिक म्हणजे 66 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पाच टक्के मतदान जास्त झाले आहे. या जादा मतदानाचा फायदा नेमका कुणाला होणार याविषयी उत्सुकता आहे. जादा मतदान आपल्याच पारड्यात झाल्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडीने केला आहे.
हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : विदर्भात महायुतीची आघाडी; प्राथमिक फेरीत हे कल समोर
राज्यात मतदान झाल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्याचा अंदाज वर्तविला आहे. पोल डायरी, चाणक्य, मॅट्रिझ, पीपल्स पल्स यांच्या अंदाजानुसार मतदारांनी स्पष्टपणे महायुतीला कौल दिला आहे. विशेष म्हणजे, महायुतीला महायुतीला 122 ते 195 या दरम्यान जागा मिळतील, असा अंदाज या संस्थांनी वर्तविला होता.
तर, टीव्ही 9 च्या सर्वेक्षणात महायुतीला 129 ते 139 जागा आणि महाआघाडीला 136 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, पी मार्कमध्ये महायुतीला 137 ते 157 आणि मविआला 126 ते 146 आणि इतरांना 2 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. केवळ इलेक्टोरोल एजचे आकडे मविआसाठी समाधानकारक असून या सर्वेक्षणात महायुतीला 121, मविआला 150 आणि इतरांना 20 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता.
प्रत्यक्षात मात्र, महायुतीने सुमारे 215 जागांवर आघाडी घेतली असून महायुती केवळ 51 जागांवरच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. त्यातही 2014च्या विधानसभा निवडणुकीत 122 जागा आणि 2019मध्ये 105 जागा जिंकण्याऱ्या भाजपाच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्याचे पाहायला मिळत आहे. तब्बल 127 जागांवर भाजपाने मुसंडी मारली आहे. त्यामुळे 2019च्या निवडणुकीपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारे देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील, अशी चिन्हे आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे वाटत असल्याचे सूचक विधान भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीही केले आहे. (Maharashtra Election Results 2024 : Mahayuti’s strong lead, MVA’s big defeat)
हेही वाचा – Sanjay Raut : कुछ तो गडबड है… सुरुवातीच्या कलांवर संजय राऊतांना शंका