Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Results 2024 : बंडखोरी अन् अपक्षांचा फटका मविआलाच, भाजपाचेही नुकसान

Maharashtra Election Results 2024 : बंडखोरी अन् अपक्षांचा फटका मविआलाच, भाजपाचेही नुकसान

Subscribe

राज्यातील 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले. मतदारांनी भरभरून मते दिल्याने महायुतीने 230 जागा जिंकल्या. तर, महाविकास आघाडी केवळ 46 जागांवर मर्यादित राहिली. मात्र, मनसे, वंचित बहुजन आघाडी यासह अपक्ष तसेच बंडखोर उमेदवारांमुळेही अनेकांचा विजय हिरावल्याचे समोर आले आहे.

(Maharashtra Election Results 2024) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित लागला. महायुतीला घवघवीत यश मिळाले, तर महाविकास आघाडीचे पानिपत झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबरच बंडखोरांचाही प्रभाव या निवडणुकीत पाहायला मिळाला. या अपक्षांचा फटका सर्वाधिक महाविकास आघाडीला बसल्याचे समोर आले आहे. (MVA and Mahayuti hit due to rebels as well as independents)

राज्यातील 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले. मतदारांनी भरभरून मते दिल्याने महायुतीने 230 जागा जिंकल्या. तर, महाविकास आघाडी केवळ 46 जागांवर मर्यादित राहिली. मात्र, मनसे, वंचित बहुजन आघाडी यासह अपक्ष तसेच बंडखोर उमेदवारांमुळेही अनेकांचा विजय हिरावल्याचे समोर आले आहे. साधारणपणे 20 ठिकाणी अपक्षांनी महायुती आणि महाविकास आघाडीला मोठी लढत दिली. त्यात महाविकास आघाडीला जास्तच बसला. यात प्रामुख्याने 16 बंडखोर होते, हे उल्लेखनीय. तथापि, यातील 9 अशा लढती आहेत की, बंडखोर उमेदवाराचा फारसा परिणाम विजयी उमेदवारावर झाला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Eknath Shinde : भाजपच्या ‘त्या’ ऑफर्सवर शिंदेंनी टाकली गुगली, वरिष्ठ नेतृत्त्व पेचात; कसा मार्ग काढणार?

अकोले मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे 5 हजार 556 मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमित भांगरे यांचा पराभव केला. तथापि, भाजपाचे बंडखोर उमेदवार वैभव पिचड यांना 32 हजार 783 मते मिळाली. अलिबागमध्येही भाजपाच्या दिलीप भोईर यांनी बंड केले होते. त्यांना 33 हजार 210 मते मिळाली. शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांचा 29 हजार 565 मतांनी पराभव केला.

- Advertisement -

बेलापूरमध्येही भाजपा उमेदवार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे बंडखोर विजय नाहटा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) संदीप नाईक यांच्यावर अवघ्या 377 मतांनी निसटता विजय मिळवला. तर, विजय नाहटा यांना 19 हजार 646 मते मिळाली. घनसावंगीमध्ये शिवसेनेच्या हिकमत उढाण यांनी माजी मंत्री आणि एनसीपी एसपीचे उमेदवार राजेश टोपे यांचा 2 हजार 309 मतांनी पराभव केला. तर, भाजपाचे बंडखोर उमेदवार सतीश घाटगे यांना 23 हजार 696 मत पडली.

मुखेडमध्ये भाजपाच्या तुषार राठोड यांनी काँग्रेसच्या हणमंत पाटील यांचा 37 हजार 784) मतांनी पराभव केला. तर, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार बालाजी खतगावकर यांना 48 हजार 235 मते मिळाली. पाचोरामध्येही भाजपाचे बंडखोर अमोल शिंदे यांना 58 हजार 71 मते मिळाली. तर दुसरीकडे, शिवसेनेच्या किशोर पाटील यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या वैशाली सूर्यवंशी यांचा 38 हजार 689 मतांनी पराभव केला. साक्रीमध्येही शिवसेनेच्या मंजुळा गावित यांनी काँग्रेसच्या प्रवीण चौरे यांचा 5 हजार 584 मतांनी पराभव केला. तर, भाजपाचे बंडखोर मोहन सूर्यवंशी यांना 14 हजार 288 मते मिळाली. शेवगावमध्ये भाजपाच्या मोनिका राजळे यांनी एनसीपी एसपीच्या प्रतापराव ढाकणे यांचा 19 हजार 43 मतांनी पराभव केला राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर चंद्रशेखर घुले पाटील यांना 57 हजार 988 मते मिळाली. म्हणजेच, महायुतीत बंड होऊन होऊनही विजय महायुतीचाच झाला.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : ईव्हीएम है तो मुमकीन है, विधानसभा निकालावरून ठाकरे गटाचा घणाघात

वर्साेवा येथे भाजपाच्या भारती लव्हेकर यांचा ठाकरे गटाच्या हारून शेख यांनी 1600 मतांनी पराभव केला. तर, ठाकरे गटाचे बंडखोर राजू पेडणेकर यांना 6 हजार 752 मते मिळाली. याचा अर्थ असा की, ठाकरे गटातील बंडखोरीचा निकालावर फारसा परिणाम झाला नाही.

बंडखोरीचा महायुतीला फटका

  • साकोली

नाना पटोले (काँग्रेस) 96,795 (+208)
अविनाश ब्राह्मणकर (भाजपा) 96,587
सोमदत्त करंजेकर (भाजपा बंडखोर) 18,309

  • उमरेड

संजय मेश्राम (काँग्रेस) 85,372 (+12,825)
सुधीर पारवे (भाजपा) 72,547
प्रमोद घरडे (भाजपा बंडखोर) 49,262


बंडखोरीचा मविआला फटका

  • भिवंडी पश्चिम

महेश चौघुले (भाजपा) 70,172 (+31,293)
रियाज आझमी (सपा) 38,879
विलास पाटील (काँग्रेस बंडखोर) 31,579

  • इंदापूर

दत्तात्रेय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस) 11,7236 (+19,410)
हर्षवर्धन पाटील (एनसीपी एसपी) 97,826
प्रवीण माने (एनसीपी एसपी बंडखोर) 37,917

  • माजलगाव

प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी काँग्रेस) 66,009 (+5,899)
मोहन जगताप (एनसीपी एसपी) 60,110
रमेश आडसकर (एनसीपी एसपी बंडखोर) 38,981

  • पारनेर

काशिनाथ दाते (राष्ट्रवादी काँग्रेस) 11,3630 (+1,526)
राणी लंके (एनसीपी एसपी) 11,2104
संदेश कार्ले (ठाकरे गट बंडखोर) 10,803

  • परतूर

बबनराव लोणीकर (भाजपा) 70659 (+4740)
ए. जे. बोराडे (ठाकरे गट) 65,919
सुरेशकुमार जेथलिया काँग्रेस बंडखोर 53,921


अपक्षांचा धक्का

  • वर्धा

पंकज भोयर (भाजपा) 92,067 (+7470)
शेखर शेंडे (काँग्रेस) 84597
सचिन पावडे (अपक्ष) 8728

  • नागपूर मध्य

प्रवीण दटके (भाजपा) 90,560 (+11,632)
बंटी शेळके (काँग्रेस) 78,928
रमेश पुणेकर (अपक्ष) 23,302

  • शहापूर

दौलत दरोडा (राष्ट्रवादी काँग्रेस) 73,081 (+1,672)
पांडुरंग बरोरा (एनसीपी एसपी) 71,409
रंजना उघाडा (अपक्ष) 42,776

  • श्रीरामपूर

हेमंत ओगले (काँग्रेस) 66,099 (+13,373)
भाऊसाहेब कांबळे (शिवसेना) 52,726
सागर बेग (अपक्ष) 47,860

हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : मुंबईतील किती उमेदवारांनी गमावले डिपॉझिट?


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -