Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीMaharashtra Election Results 2024 : मविआ की महायुती, छोटे पक्ष-अपक्षांची साथ कोणाला?

Maharashtra Election Results 2024 : मविआ की महायुती, छोटे पक्ष-अपक्षांची साथ कोणाला?

Subscribe

विधानसभा निवडणुकीतील निकालनुसार, समाजवादी पक्षाला 2 जागा, एमआयएम पक्षाला 1 जागा, शेतकरी कामगार पक्ष 1 जागा, सीपीआयएम (माकप) 1 जागा, राष्ट्रीय समाज पक्ष 1 जागा, जनसुराज्य शक्ती 2 जागा, राजश्री शाहू विकास आघाडी 1 जागा आणि अपक्ष 2 जागा अशा एकूण 12 जागांवर छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मात्र आता राज्याच्या राजकारणात हे 12 विजयी उमेदवार कोणाला साथ देतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

मुंबई : देशाचं राजकारणं बदलण्याची ताकद असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट बहुमत महायुतीच्या बाजूने दिल्याचं पाहायला मिळालं. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशा तीन पक्षांची मिळून महाराष्ट्रात महायुती असून त्यांनी मोठा विजय विधानसभा निवडणुकीत मिळवला. विशेष म्हणजे, राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नसेल, अशी स्थिती महायुतीने निर्माण केली आहे. मात्र या सगळ्यात आता छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची चर्चा रंगली आहे. (Maharashtra Election Results 2024 MVA or Mahayuti who will support the small party independent winning candidates)

विधानसभा निवडणुकीतील निकालानुसार, समाजवादी पक्षाला 2 जागा, एमआयएम पक्षाला 1 जागा, शेतकरी कामगार पक्ष 1 जागा, माकपाला 1 जागा, राष्ट्रीय समाज पक्ष 1 जागा, जनसुराज्य शक्ती 2 जागा, राजश्री शाहू विकास आघाडी 1 जागा आणि अपक्ष 2 जागा अशा एकूण 12 जागांवर छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मात्र आता राज्याच्या राजकारणात हे 12 आमदार ऐन मोक्याच्या क्षणी कोणाला साथ देतात, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

महायुतीसोबत कोण?

राज्याच्या राजकारणात आतापर्यंत अपक्ष आमदारांनी सत्ताधाऱ्यांना साथ दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित अपक्ष आमदार शिवाजी पाटील आणि शरददादा सोनावणे हे महायुतीला साथ देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, राष्ट्रीय समाज पक्षाने यंदा स्वतंत्र निवडणूक लढवली. परंतु, या रासपचे प्रमुख महादेव जानकर हे नेहमीच भाजपसोबत असल्याते पाहायला मिळाले आहे. त्यामुळे रासपचे विजयी उमेदवार रत्नाकर गुट्टे हे महायुतीला साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख रवी राणा असून त्यांची साथ भाजपलाच राहिली आहे. त्यामुळे अर्थातच या पक्षाचे नवनिर्वाचित आमदार रवी राणा यांचा पाठिंबा महायुतीलाच राहील. त्याचप्रमाणे, जनसुराज्य शक्ती आणि राजश्री शाहू विकास आघाडी हे दोन पक्ष शिवसेना शिंदे गटाचे मित्र पक्ष असल्याने या पक्षाचे आमदार हे महायुतीला साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाविकास आघाडीसोबत कोण?

याशिवाय यंदाच्या राजकारणात विरोध स्थापन करण्याइतपत उमेदवार विजयी करू न शकलेल्या महाविकास आघाडीला राजकीय पुनर्वसन करणे कठीण होणार आहे. त्यामुळे विजयी छोटे पक्ष आणि अपक्ष त्यांची साथ देतील का? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र असे असले तरी, समाजवादी पक्षाने  नेहमीच मविआची साथ दिली आहे. तर, एमआयएमने भाजपाला विरोध दर्शवत अनेकदा तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यांची ही भूमिका महायुतीच्या पथ्यावर पडली आहे. मात्र शेतकरी कामगार पक्ष आणि माकपा यांनी महाविकास आघाडीत राहून निवडणूक लढवली असली तरी, विधानसभेचा निकाल पाहता या पक्षांचे विजयी उमेदवार गरजेच्यावेळी महाविकास आघाडीला पाठिंबा देतात का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

छोटे पक्ष – अपक्षांची भूमिका ही राज्यसभा, विधान परिषद निवडणुकांच्या काळात किंवा एखादे महत्त्वाचे विधेयक संमत करताना अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण राज्यसभेत खासदार निवडून देण्यासाठी आणि विधान परिषदेत आमदार पाठवण्यासाठी पुरेसे संख्याबळ असणे गरजेचे असते, हे उल्लेखनीय.

छोटे पक्ष – अपक्ष विजयी उमेदवारांची सविस्तर माहिती

समाजवादी पक्ष

  • मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमी यांनी 54780 मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक (15501) तसेच, शिवसेनेच्या सुरेश पाटील (35263) यांचा पराभव केला.
  • भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी 119687 मते घेऊन 52,015 मतांच्या फरकांनी शिवसेनेच्या संतोष शेट्टी (67672) यांचा पराभव केला.

एमआयएम

  • मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती यांनी (109653) 162 मतांच्या फरकांने अपक्ष उमेदवार आसिफ शेख (109491) यांचा पराभव केला.

शेतकरी कामगार पक्ष

  • सांगोला विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख (116256) यांनी 25386 मतांच्या फरकांनी शिवसेनेचे उमेदवार शाहाजी बापू पाटील (90870) यांचा पराभव केला.

सीपीआय-एम (माकप)

  • डहाणू मतदारसंघात सीपीआयएमचे उमेदवार विनोद निकोले (104702) यांनी 5133 मतांच्या फरकांने भाजपाचे उमेदवार विनोज मेढा यांचा (99569) पराभव केला.

राष्ट्रीय समाज पक्ष

  • गंगाखेड मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे (141544) यांनी 26292 मतांच्या फरकाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विशाल कदम (115252) यांचा पराभव केला.

जनसुराज्य शक्ती

  • शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार विनय कोरे (136064) यांनी 36053 मतांच्या फरकाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील (100011) यांचा पराभव केला.
  • हातकणंगले मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोक माने (134191) यांनी 46249 मतांच्या फरकाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजू आवळे (87942) यांचा पराभव केला.

राजश्री शाहू विकास आघाडी

  • शिरोळ मतदारसंघात राजश्री शाहू विकास आघाडी पक्षाचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर (134630) यांनी 40816 मतांच्या फरकाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार गणपतराव पाटील (93814) यांचा पराभव केला.

राष्ट्रीय युवा स्वाभिमान

  • बडनेरा मतदारसंघात राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा (127800) यांनी 66974 मतांच्या फरकाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील खराटे (7121) यांचा पराभव केला.

अपक्ष

  • चंदगड मतदारसंघात अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील (84254) यांनी 24134 मतांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार राजेश पाटील (60120) यांचा पराभव केला.
  • जुन्नर मतदारसंघात अपक्ष उमेदवार शरददादा सोनावणे (73355) यांनी 6664 मतांच्या फरकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सत्यशील शेरकर (66691) यांचा पराभव केला.

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्राच्या स्वाभिमानी प्रतिमेला धक्का देणारा हा प्रकार, ठाकरे गटाचा संताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -