Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Results 2024 : मुंबईत विद्यमान आमदारांचीच चलती, भाजपाचा प्रभाव कायम

Maharashtra Election Results 2024 : मुंबईत विद्यमान आमदारांचीच चलती, भाजपाचा प्रभाव कायम

Subscribe

मुंबईत भाजपाला मोठा विजय मिळाला असून अनेक उमेदवार आहेत, जे विद्यमान आमदार होते आणि त्यांना मतदारांनी पुन्हा एकदा निवडून देत आणखी एक संधी दिली. यामध्ये भाजपाच्या सर्वाधिक आमदारांचा समावेश आहे.

मुंबईत : राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालामुळे महायुतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर महाविकास आघाडीचे तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यात महायुतीमधील भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबईत भाजपाला मोठा विजय मिळाला असून एकूण 15 जागांवर भाजपाच्या उमेदवारांना विजय मिळाला आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे 06 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे. त्यामुळे मुंबईतील 36 विधानसभांपैकी 22 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे 14 उमेदवार विजयी झाले असून यामध्ये समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांचा समावेश आहे. (Maharashtra Election Results 2024 Only existing MLAs move in Mumbai)

मुंबईमध्ये अनेक उमेदवार आहेत, जे विद्यमान आमदार होते आणि त्यांना मतदारांनी पुन्हा एकदा निवडून देत आणखी एक संधी दिली. यामध्ये भाजपाच्या सर्वाधिक आमदारांचा समावेश आहे. मनिषा चौधरी, अतुल भातखळकर, पराग अळवणी, पराग शाह, कालिदास कोळंबकर, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, मिहिर कोटेचा, योगेश सागर, विद्या ठाकूर, अमित साटम, राम कदम, कॅप्टन तमिल सेल्वन, आशिष शेलार या आमदारांचा समावेश आहे. त्याशिवाय, शिवसेना शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे या आमदारांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Maharashtra Election Results 2024 : मुंबईत फक्त तीन माजी नगरसेवक झाले आमदार; 15 जणांचा पराभव

महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतीलही काही विद्यमान आमदार पुन्हा विधिमंडळात गेले आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील राऊत, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, सुनील प्रभू, संजय पोतनीस यांचा समावेश असून काँग्रेसमधील अस्लम शेख आणि अमिन पटेल या आमदारांनीही आपला गड राखला आहे. तर मविआला पाठिंबा देणाऱ्या सपाचे अबू आझमी हे सुद्धा पुन्हा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार आपला गड राखण्यात कायम राहिले आहेत. त्यांनी जनतेने त्यांच्या विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली असल्याचे पाहायला मिळत आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -