Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Results 2024 : मविआच्या सत्तास्थापनेच्या मार्गात अडथळे आणण्याचे कारस्थान, ठाकरे...

Maharashtra Election Results 2024 : मविआच्या सत्तास्थापनेच्या मार्गात अडथळे आणण्याचे कारस्थान, ठाकरे गटाचा दावा

Subscribe

महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी लागणारे पूर्ण बहुमत मिळत आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा आणि ‘परेड’ घेऊन राजभवनात पोहोचणे तसेच त्यांची कारस्थाने रोखणे यासाठी एकजुटीचे प्रदर्शन घडवावे लागेल, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

(Maharashtra Election Results 2024) मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही जोडी आणि त्यांच्या जोडीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या मंडळींनी त्यांच्या मनाप्रमाणे ‘एक्झिट’ पोल लावून घेतले आणि त्या जोरावर ते आपल्या विजयाच्या ‘टिऱ्या’ बडवत अपक्ष, छोटे पक्ष यांच्यावर दाबदबाव आणीत आहेत, पण लोकांनी ठरवले आहे, जिंकणार तर महाविकास आघाडीच, असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या विजयात आणि विजयानंतर सत्तास्थापनेच्या मार्गात अडथळे आणण्याचे कारस्थान रचले गेले आहे, असा दावाही ठाकरे गटाने केला आहे. (Thackeray group accuses Mahayuti regarding the formation of power)

महाराष्ट्राच्या जनतेचा कौल मानायचा नाही आणि लोकशाहीचा मुडदा पाडून अल्पमतात आलो तरी राजभवनातील भाजपा कार्यालयात जाऊन सरकार स्थापनेचा दावा करायचा. त्यानंतर गोंधळाच्या परिस्थितीत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करून महाराष्ट्रात राजकीय अराजक घडवायचे, अशा सडक्या विचारांच्या जोर बैठका सुरू असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत इतक्या अपक्षांनी दिला धक्का

आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागतील. निकाल लागण्याआधी राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल काय? अशी शंका निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी तसेच त्यांच्या जोडीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या झुंडशाहीचे बळ असल्यावर देशात काहीही अघटित घडू शकते, अशी भीती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून व्यक्त केली आहे.

- Advertisement -

राजभवनात घटनेला धरून निर्णय व्हायला हवेत, पण गेल्या काही काळापासून राजभवनासारख्या घटनात्मक संस्थांचेही भाजपाने साफ मातेरे करून ठेवले आहे. महाराष्ट्राच्या राजभवनाची प्रतिष्ठा तर या लोकांनी साफ रसातळाला नेली आहे. मुळात सरकार स्थापनेसाठी जो अगदी मर्यादित कालावधी देण्यात आला आहे तोच एका व्यापक कटाचा भाग आहे. 26 तारखेला राज्यात नवीन सरकार स्थापन करणे बंधनकारक आहे. राज्यपाल अनेक तांत्रिक कारणे उपस्थित करून भाजपा आणि त्यांच्या अल्पमती बगलबच्च्यांना मदत करतील. कारण सध्या राजभवनात काय चालते आणि कोणाच्या नेमणुका होतात ते जगजाहीर आहे, असे शरसंधान ठाकरे गटाने केले आहे.

महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी लागणारे पूर्ण बहुमत मिळत आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा आणि ‘परेड’ घेऊन राजभवनात पोहोचणे तसेच त्यांची कारस्थाने रोखणे यासाठी एकजुटीचे प्रदर्शन घडवावे लागेल, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – Maharashtra Marathwada Result 2024 : मराठवाड्यात जरांगे, जात आणि शेती फॅक्टर ठरणार परिणामकारक; पोस्टल मतांची मोजणी सुरु


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -