Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Reuslts 2024 : निकाल संशयास्पद आहेत, तरीही.., ठाकरे गट काय...

Maharashtra Election Reuslts 2024 : निकाल संशयास्पद आहेत, तरीही.., ठाकरे गट काय म्हणाला?

Subscribe

आरएसएसची रसद भाजपासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात उतरवण्यात आली आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीची सूत्रे संघाने आपल्या हातात घेतली. शिवाय, गुजरातमधून 90 हजार जणांची फौज महाराष्ट्रात उतरवून भाजपाने विजयासाठी गुजरात मॉडेलचा वापर केला. हा खुलासा खुद्द पंकजा मुंडे यांनीच केला असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

(Maharashtra Election Reuslts 2024) मुंबई : महाराष्ट्राचे निकाल अनाकलनीय आहेत, यावर सगळ्यांचेच एकमत बनले आहे. या सगळ्यात स्वतः भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीसदेखील आहेत. भाजपा आणि त्यांच्या बगलबच्च्यांना मिळालेल्या छप्परफाड जागा पाहून आपल्यालाही आश्चर्याचा धक्काच बसल्याचे फडणवीस यांनी मान्य केले. निकाल संशयास्पद आणि रहस्यमय आहेत, तरीही लोकशाहीचा कौल वगैरे मान्य करून ते स्वीकारायचे असतात, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. (Thackeray Group Doubts About Mahayuti’s Victory)

दोन राज्यांत निवडणुका झाल्या. झारखंडचा निकाल हा हेमंत सोरेन यांच्या बाजूने लावला आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि राजकीय, आर्थिकदृष्ट्या मोठ्या राज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्यापारी लॉबीने ‘ताबा’ मिळवला. या मंडळींनी लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्य जिंकले यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

महाराष्ट्राची अवस्था ही गुजरातच्या वाटेवरील पायपुसण्यासारखीच झाली आहे आणि त्यामुळे पैशांच्या बळावर अशी अनेक पायपुसणी निवडून आणली. भारतीय जनता पक्षाला तसेच त्यांच्या मिंध्यांना यात मर्दुमकी वाटत आहे आणि तसे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. महाराष्ट्राची मर्दानगी, स्वाभिमान मारून शिवरायांच्या महाराष्ट्राला थैलीवाल्यांच्या पायाचे दास बनवले, याचा कुणाला आनंद झाला असेल तर त्यांनी खुशाल विजयाच्या जिलब्या खाव्यात, पण महाराष्ट्र आपला लढाऊ बाणा सोडणार नाही, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

- Advertisement -

विजयासाठी भाजपाकडून गुजरात मॉडेलचा वापर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रसद भाजपासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात उतरवण्यात आली आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीची सूत्रे संघाने आपल्या हातात घेतली. शिवाय, गुजरातमधून 90 हजार जणांची फौज महाराष्ट्रात उतरवून भाजपाने विजयासाठी गुजरात मॉडेलचा वापर केला. हा खुलासा खुद्द पंकजा मुंडे यांनीच केला. महाराष्ट्रात बाजूच्या गुजरात राज्यातून लाखभर लोक येतात आणि प्रत्येक मतदारसंघात तळ ठोकून बसतात. याचा काय अर्थ घ्यायचा? कुणी म्हणतात येथे निवडणुकीत वापरलेल्या ‘ईव्हीएम’सुद्धा गुजरातमधूनच आणल्या, असा संशयही ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Election Results 2024: Thackeray Group Doubts About Mahayuti’s Victory)

हेही वाचा – Politics : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण; महाजन आणि राऊतांची सूचक विधाने


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -