Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Results 2024 : मोदींना घराणेशाहीची यादी हवी असेल तर..., ठाकरे...

Maharashtra Election Results 2024 : मोदींना घराणेशाहीची यादी हवी असेल तर…, ठाकरे गटाची खोचक टीका

Subscribe

मोदी यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहिला हे सांगणे म्हणजे दिशाभूल आहे. मग केरळात वायनाड येथे प्रियंका गांधी चार लाखांच्या मताधिक्याने जिंकल्या, तेथे मोदी यांची जादू का चालू नये? तेथील मतदारही भाजपाचेच नागरिक आहेत ना? असा प्रश्न ठाकरे गटाने केला आहे.

(Maharashtra Election Results 2024) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा कार्यालयात जाऊन जल्लोष केला. ते म्हणतात, ‘‘महाराष्ट्रात नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला. खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला. खोटेपणा, कपट, विभाजनकारी शक्ती, घराणेशाहीचा पराभव झाला.’’ मोदी यांचे हे विधान नक्की कोणासाठी आहे? मुळात भाजपामधीलच अनेक घराणी या निवडणुकीत उतरवली गेली होती. पंतप्रधान मोदी यांना घराणेशाहीची यादी हवी असेल तर ती त्यांनी नारायण राणे, उदय सामंत, आशीष शेलार वगैरे त्यांच्याच लोकांकडून घ्यावी, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray group strongly criticizes Modi over political dynasticism)

मोदी आणि त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रात नकारात्मक प्रचार केला. संघाचे प्रचारक घराघरांत जाऊन विद्वेषाचे विष कालवून लोकांची डोकी भडकवीत होते. प्रचाराची पातळी अत्यंत खाली नेऊन महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकच लावला, अशी जहरी टीका सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : ईव्हीएमचा घोळ? 95 मतदारसंघांतील आकडेवारीवर संशय, जबाबदार कोण?

मोदी यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहिला हे सांगणे म्हणजे दिशाभूल आहे. मग केरळात वायनाड येथे प्रियंका गांधी चार लाखांच्या मताधिक्याने जिंकल्या, तेथे मोदी यांची जादू का चालू नये? तेथील मतदारही भाजपाचेच नागरिक आहेत ना? बाजूच्या कर्नाटकातील पोटनिवडणुकीत सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या. नांदेड लोकसभेची पोटनिवडणूकही काँग्रेसने जिंकली. तेथे यांची जादू का चालली नाही? असे प्रश्न ठाकरे गटाने केले आहेत.

- Advertisement -

भाजपाच्या विजयाचा हाच फॉर्म्युला

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात दुहीची बीजे पेरली, जाती-धर्मात दरी पाडली, मत विभागणीसाठी छोट्या पक्षांना सुपाऱ्या देऊन आपले काम साधले. हाच भाजपा विजयाचा ‘फॉर्म्युला’ म्हणता येईल. जोडीला प्रचंड पैसा आणि सरकारी यंत्रणा असल्याने विजयाच्या मार्गावरील खड्डे दूर झाले, अशी जहरी टीका ठाकरे गटाने केली आहे. (Maharashtra Election Results 2024: Thackeray group strongly criticizes Modi over political dynasticism)

हेही वाचा – Ajit Pawar : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे यश; अजित पवारांनी सांगितले


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -