Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Results 2024 : निवडून येणारे सर्व शुद्ध असतील, ठाकरे गटाचा...

Maharashtra Election Results 2024 : निवडून येणारे सर्व शुद्ध असतील, ठाकरे गटाचा दावा

Subscribe

राज्यात अस्थिरता आणि गोंधळ निर्माण झाला तरी चालेल, लोकशाही स्वातंत्र्याची धूळधाण उडवून संविधान नष्ट केले तरी चालेल, पण बेकायदा मार्गाने सत्तेवर चढायचे हा भाजपाचा खाक्या आहे. भाजपा आणि त्यांच्या मिंधे मंडळाने महाराष्ट्र विकायला काढला आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीने हा बाजार उधळून लावला, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

(Maharashtra Election Results 2024) मुंबई : आमदार अपात्रतेबाबतचा स्पष्ट निकाल न देता आपले बोलबच्चन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त झाले. त्यामुळे पक्षांतराबाबतच्या घटनेतील 10व्या शेड्युलचे सर्वोच्च न्यायालयानेच पानिपत केले. हे सत्य असले तरी गद्दारीचा सर्व कचरा उडून गेला आणि आज निवडून येतील ते सर्व लोक शुद्ध असतील. त्यांच्यावर कोणत्या भ्रष्ट मात्रेचा अंमल होणार नाही, असे सांगतानाच, तरीही महाविकास आघाडी म्हणून ‘जागते रहो’च्या भूमिका वठवाव्या लागतील, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. (Thackeray group’s belief about winning candidates)

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत असताना पडद्यामागे होणाऱ्या हालचाली महत्त्वाच्या आहेत. एकमेकांचे आमदार पळवले जातील किंवा फोडले जातील, अशी भीती व्यक्त होणे लोकशाहीला धोकादायक आहे; पण राज्यात हे असले प्रकार वारंवार घडू लागले आहेत. 2019मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले प्रत्येकी चाळीस-चाळीस आमदार एका रात्रीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘ढोकला’ तंबूत पळून गेले आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडले गेले, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : मविआच्या सत्तास्थापनेच्या मार्गात अडथळे आणण्याचे कारस्थान, ठाकरे गटाचा दावा

राज्यात अस्थिरता आणि गोंधळ निर्माण झाला तरी चालेल, लोकशाही स्वातंत्र्याची धूळधाण उडवून संविधान नष्ट केले तरी चालेल, पण बेकायदा मार्गाने सत्तेवर चढायचे हा भाजपाचा खाक्या आहे. भाजपा आणि त्यांच्या मिंधे मंडळाने महाराष्ट्र विकायला काढला आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीने हा बाजार उधळून लावला. महाराष्ट्रात एक प्रामाणिक आणि महाराष्ट्र धर्म पाळणारे सरकार येत आहे. त्यात अडथळे आणणाऱ्यांनाही धूळ चारून महाविकास आघाडीचा जय होईल, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

मतदान टक्केवारीतील ‘वाढ’ खरी की कृत्रिम सूज आहे?

मतदान झाल्यावर किती टक्के मतदान झाले त्याची माहिती निवडणूक आयोगाने जाहीर केल्यावर पुढच्या 72 तासांत त्या टक्केवारीत वाढ होते आणि त्या वाढत्या टक्केवारीचा काहीच आगापिछा लागत नाही. निवडणूक आयोग सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवायचा हा सर्वच प्रकार संशयास्पद आहे. असे संशयास्पद व रहस्यमय प्रयोग लोकसभेत, हरियाणा विधानसभा निवडणुकीत झाले. आता ते महाराष्ट्राच्या विधानसभा निकालातही घडत आहेत, पण आहे त्या संकटाला सामोरे जाऊन सत्याची लढाई लढायची, एवढेच आपल्या हाती आहे. मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली हे नक्की, मात्र त्याचा फायदा नक्की कुणाला होतोय? हे पाहण्यापेक्षा ही ‘वाढ’ खरी की कृत्रिम सूज आहे यावर संशोधन होणे गरजेचे आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. (Maharashtra Election Results 2024 : Thackeray group’s belief about winning candidates)

हेही वाचा – Maharashtra Election 2024 Result : शिंदे, फडणवीसांसह या निकालांकडे लक्ष; कोण मारणार बाजी?


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -