Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Results 2024 : निवडणूक निकालात घराणेशाहीचा बोलबाला

Maharashtra Election Results 2024 : निवडणूक निकालात घराणेशाहीचा बोलबाला

Subscribe

यंदाच्या निवडणुकीत घराणेशाहीचा मोठा विजय झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काही भावंडाच्या जोड्या विधीमंडळात पाहायला मिळणार आहे. तर काही घरांमध्ये कोण खासदार, तर कोण आमदार बनले आहेत.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच धक्का दिला आहे. महायुतीने तब्बल 230 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला पाणी पाजले आहे. एक्झिट पोल व राजकीय विश्लेषकांचे, तज्ज्ञांचे अहवालही या निकालासमोर सपशेल अपयशी ठरले आहे. पण यंदाच्या निवडणुकीत घराणेशाहीचा मोठा विजय झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काही भावंडाच्या जोड्या विधीमंडळात पाहायला मिळणार आहे. तर काही घरांमध्ये कोण खासदार, तर कोण आमदार बनले आहेत. त्यामुळे मतदारांनीच आता घराणेशाहीला मान्यता दिली आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. (Maharashtra Election Results 2024 The dominance of dynasticism)

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कौल देत काँग्रेसचे सर्वाधिक खासदार लोकसभेत पाठवले. त्यामुळे विधानसभेतही तसेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. घराणेशाहीच्या या मुद्द्यामध्ये सध्या सर्वात प्रथम नाव समोर येते ते म्हणजे राणे कुटुंबियांचे. कारण खासदार नारायणे यांच्यानंतर आता त्यांची दोन्ही मुले नितेश राणे आणि निलेश राणे हे विधानसभेवर निवडून गेले आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर आता लगेच त्यांच्या दोन्ही मुलांनी विधानसभा निवडणूक जिंकल्याने ते आमदार बनले आहेत. त्यामुळे, एकाच घरात वडील खासदार आणि दोन्ही मुले आमदार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Maharashtra Election Results 2024 : ईव्हीएमचा घोळ? 95 मतदारसंघांतील आकडेवारीवर संशय, जबाबदार कोण?

नारायण राणे यांच्याशिवाय मुंबईतील काँग्रेसच्या दोन महिला नेत्या आहेत, ज्यातील मोठी बहीण लोकसभेत खासदार आहे, तर लहान बहीण विधानसभेत विजयी झाली आहे. या योग साधला तो, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आणि त्यांची धाकडी बहीण ज्योती गायकवाड यांनी. वर्षा गायकवाड यांनी गेली अनेक वर्ष धारावी विधानसभेत आमदार पद सांभाळले. पण लोकसभा 2024 च्या निवडणुकीत त्या खासदार झाल्या, ज्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धारावीतून वर्षा गायकवाड यांच्या लहान बहीण डॉ. ज्योती गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवत काँग्रेसचा गड कायम राखला आहे.

- Advertisement -

राज्याच्या राजकारणातील प्रमुख नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांनी भोकर विधानसभेत विजय मिळवला आहे. त्यामुळे वडील राज्यसभेवर खासदार आणि कन्या विधानसभेत आमदार असे चित्र या घरात पाहायला मिळत आहे. तर बारामती जिल्ह्याला घारणेशाहीची मोठी परंपरा लाभलेली आहे. कारण बारामतीतील पवार कुटुंबात आता दोन गट जरी निर्माण झाले असले तरी या कुटुंबातील दोन महिला खासदार आणि दोन पुरुष आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेत आमदार आहेत. तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेत पराभूत झालेल्या असल्या तरी त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे ही पती पत्नीची जोडी आमदार-खासदार आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटातील सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून लोकसभेत खासदार असून त्यांचा भाचा रोहित पवार हा कर्जत जामखेड विधानसभेत आमदार आहे. म्हणजेच राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गोटात आत्या सुप्रिया सुळे या लोकसभेत तर भाचा रोहित पवार विधानसभेत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या कित्येक वर्षांपासून आमदारकी पदावर असून त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे शिंदेंच्या घरातील ही बाप लेकाची जोडी आमदारकी आणि खासदारकी भूषवित आहे. तर, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई हे दोघेही विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे, येथेही नात्यागोत्यांची घराणेशाही दिसून येते. तसेच, आता माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे स्वतः लोकसभेला पराभूत झाले असले तरी त्यांची दोन्ही मुले आमदार बनली आहेत. मुलगा संतोष दानवे आणि कन्या संजना जाधव निवडणुकीत विजयी होऊन लवकरच आमदारकीची शपथ घेणार आहेत.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -