(Maharashtra Election Results 2024) मुंबई : विधानसभेचे निकाल लागले. निकाल लागले, पण हा जनतेचा कौल नाही. भाजपापुरस्कृत महायुतीला 230 जागा मिळू शकतात. यावर कोणाचा विश्वास बसेल? बेइमान शिंदे गट 57 आणि तोळामांसाचा अजित पवार गट 41 जागांवर विजयी झाला. हा निकाल विचलित करणारा आहे. हा निकाल स्वीकार करण्यासारखा नाही, अशी तीव्र नाराजी ठाकरे गटाने व्यक्त केली आहे. (The Thackeray group is unhappy about the victory of the Mahayuti)
शेतकरी आत्महत्या करीत आहेत, कर्जबाजारी झाला आहे. कांदे, टोमॅटो, दूध रस्त्यावर फेकून द्यावे लागत आहे. महाराष्ट्राचा उद्योग गुजरातला पळवल्याने राज्यातला तरुण बेरोजगार झाला. बेरोजगारीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने होत नाहीत. तरीही या सरकारबद्दल प्रेमाची ही अशी लाट उसळली व त्यात एक बदनाम, घटनाबाहय़ सरकार पुन्हा विजयी झाले, यावर कुणी विश्वास तरी ठेवील काय? असा प्रश्न ठाकरे गटाने केला आहे.
हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : केवळ लाडकी बहीणमुळे समस्या संपतात का? निकालामुळे चेन्नीथला संतापले
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या नेत्यांनी महाराष्ट्रात अविश्रांत श्रम घेतले. शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, युवकांनी, महिलांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. तरीही फक्त लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला, असे कोणी म्हणत असतील तर ते बरोबर नाही, असे ठाम मत शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून मांडले आहे.
लोकसभेत महाराष्ट्राने आपला स्वाभिमानी बाणा दाखवून मोदी-शहांच्या मराठीद्वेष्टय़ा राजकारणाचा पराभव केला. मोदींचे लोकसभेतील बहुमत रोखण्याचा पुरुषार्थ ज्या महाराष्ट्राने चार महिन्यांपूर्वी दाखवला त्याच महाराष्ट्रात पुढील चार महिन्यांत विधानसभेचा हा निकाल लागला व महाराष्ट्रातील ‘महा’पणाची कुंडले गळून पडली. महाराष्ट्राचे तेजच जणू संपले, अशी उद्विग्नता ठाकरे गटाने व्यक्त केली आहे. (Maharashtra Election Results 2024: The Thackeray group is unhappy about the victory of the Mahayuti)
हेही वाचा – Narendra Modi : महाराष्ट्राने दाखवले तृष्टीकरणाचा सामना कसा करायचा; मोदींची मविआवर टीका
Edited by Manoj S. Joshi