Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Results 2024 : राहुल गांधींच्या भाषणांची जादू चालेना... सात ठिकाणी...

Maharashtra Election Results 2024 : राहुल गांधींच्या भाषणांची जादू चालेना… सात ठिकाणी झाल्या होत्या सभा

Subscribe

मविआचे मात्र या निवडणुकीत पूर्णपणे पानिपत झाले आहे. वास्तविक, या निवडणुकीत मविआसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यात सभा घेतल्या होत्या. मात्र, त्याचा फारसा फायदा मविआला झालेला दिसत नाही.

(Maharashtra Election Results 2024) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीत भाजपालाच 130 जागा मिळाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 54 जागा तर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसने 40 जागांवर आघाडी घेतली आहे. मविआचे मात्र या निवडणुकीत पूर्णपणे पानिपत झाले आहे. वास्तविक, या निवडणुकीत मविआसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यात सभा घेतल्या होत्या. मात्र, त्याचा फारसा फायदा मविआला झालेला दिसत नाही. (maharashtra election results mahavikas aghadi is far behind in the seats where rahul gandhi campaigned in maharashtra)

महाराष्ट्रात महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. दुसरीकडे मविआने या निवडणुकीत मतदारांना अनेक आश्वासने दिली होती. कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांनी आपल्या अनेक सभांमध्ये राज्यात मविआचेच सरकार येणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. मात्र, निकाल पाहता असे काहीही झालेले दिसत नाही. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात जिथे जिथे सभा झाल्या तिथल्या जागा कॉंग्रेसने गमावल्याचे दिसते आहे. तर राज्यात ज्या – ज्या ठिकाणी राहुल गांधी यांनी प्रचार केला त्या – त्या जागा लढवणारे मविआचे उमेदवार हरतानाच दिसले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : मुंबईत महायुतीचा डंका, मविआला जोरदार धक्का

राज्यातील निवडणुकांदरम्यान राहुल गांधी यांनी नंदुरबार, धामणगाव रेल्वे, नागपूर पूर्व, गोंदिया, चिमूर, नांदेड उत्तर आणि बांद्रा पूर्व या जागांसाठी सभा घेतल्या होत्या. या सगळ्या सभांना गर्दी तर चांगली जमली पण ती गर्दी मतांमध्ये परावर्तित होऊ शकली नाही. यातील केवळ एक बांद्रा पूर्वेची जागा ही मविआच्या खात्यात जमा झाली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक झाली. विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या सभेचा करिष्मा तिथेही चाललेला दिसला नाही. त्यांनी ज्या जागांसाठी प्रचार केला, त्या जागांवरील इंडि आघाडीचे उमेदवार हरताना दिसले.

मतदारसंघ                   निकाल

नंदुरबार                   भाजपा विजयी
धामणगाव रेल्वे          भाजपा विजयी
नागपूर पूर्व               भाजपा विजयी
गोंदिया                   भाजपा विजयी
चिमूर                     भाजपा विजयी
नांदेड उत्तर              शिवसेना विजयी
बांद्रा पूर्व                 ठाकरे गट विजयी


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -