Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Results 2024 : नोटाने दिला या चार उमेदवारांना धक्का

Maharashtra Election Results 2024 : नोटाने दिला या चार उमेदवारांना धक्का

Subscribe

यंदा मुंबईतील चार उमेदवारांना नोटाचा जबरदस्त फटका बसला आहे. या नोटाने मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार मनीषा वायकर आणि शरद पवार गटाचे संदीप नाईक, फहाद अहमद, महादू बरोरा या अशा 4 उमेदवारांना धक्का दिल्याचे समोर आले आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार बहुमताने सत्तेवर आले आहे. मात्र अनेक मतदार हे आपले बहुमूल्य मतदान हे असेच वाया घालवतात आणि नोटाला मतदान करतात. निवडणूक आयोगाकडून आलेल्या माहितीनुसार मुंबईतील चार उमेदवारांना नोटाचा जबरदस्त फटका बसला आहे. महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून मुंबईतील 67 मतदारसंघांपैकी 11 मतदारसंघांतील मतदारांनी तिसऱ्या क्रमांकाची पसंती नोटाला दिल्याचे समोर आले आहे. जेव्हा मतदारांना आपल्या आवडीचा किंवा कामाचा उमेदवार योग्य वाटतं नाही तेव्हा ते नोटाला पसंती देताना दिसतात. मात्र आता अशीच एक माहिती समोर आली आहे. या नोटाने मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार मनीषा वायकर आणि शरद पवार गटाचे संदीप नाईक, फहाद अहमद, महादू बरोरा या अशा 4 उमेदवारांना धक्का दिला आहे. (Four candidates defeated due to notes.)

हेही वाचा : Eknath Shinde : माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन

- Advertisement -

विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले या चार पराभूत उमेदवारांचा नोटामुळे पराभव झाला आहे. त्यामध्ये जितकी मते ही नोटाला मिळाली आहेत, त्यापेक्षा कमी मतांनी त्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार मनीषा वायकर या जोगेश्वरीतून पराभूत झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या अनंत नर यांनी त्यांचा पराभव केला आहे. अनंत नर यांना 77044 तर मनिषा वायकरांना 75503 मते मिळाली आहेत. नर यांनी 1541 मतांनी वायकर यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघात 2877 मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. ही मते वायकर यांना मिळाली असती तर त्यांचा विजय निश्चित झाला असता. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे देखील या नोटामुळे जास्त नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अणुशक्तीनगरमध्ये अजित पवार गटाच्या सना मलिक 49341 मते मिळवून विजयी झाल्या, तर शरद पवार गटाचे फहाद अहमद यांना 45963 मते मिळाली. या मतदारसंघामध्ये नोटाची मते 3844 इतकी आहेत. मलिक आणि अहमद यांच्यामधील मतसंख्येचा फरक 3378 इतका आहे.

हेही वाचा : Maulana Sajjad Nomani : महायुतीच्या विजयानंतर मौलाना नोमानींनी मागितली जाहीर माफी; म्हणाले

- Advertisement -

तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहापुरमधील उमेदवार दौलत दरोडा यांनी 73081 मते घेऊन शरद पवार गटाचे महादू बरोरा यांचा 1672 मतांनी पराभव केला आहे. बरोरा यांना 71409 मते मिळाली, तर नोटाला 4872 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात देखील नोटांमुळे बरोरा यांचे नुकसान झाले आहे. नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात बिग फाईट झाली होती. भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी केवळ 377 मतांनी नाईक यांचा पराभव केला आहे. म्हात्रे यांना 91429 मते तर नाईक यांना 91014 मते मिळाली आहेत. संदीप नाईक यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या नोटाला मात्र 2588 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे यंदाच्या विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये मुंबईतील या चार उमेदवारांना नोटांचा चांगलाच फटका बसला आहे.

 


Edited By komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -