सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; वीजदरात आजपासून वाढ, जाणून घ्या नवे दर

दरवर्षी 1 एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात होते. नव्या आर्थिक वर्षात नवे दर जारी होत असतात, तर काही दरांची घटही होत असते. परंतु, या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना शॉक बसला आहे. कारण आजपासून वीज दर महाग झाले आहेत.

electricity bill

दरवर्षी 1 एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात होते. नव्या आर्थिक वर्षात नवे दर जारी होत असतात, तर काही दरांची घटही होत असते. परंतु, या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना शॉक बसला आहे. कारण आजपासून वीज दर महाग झाले आहेत. वीज दरात 5 ते 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दर महिन्याला त्यांना वीज वापरासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे. आर्थिक वर्ष 2023-24 आणि आर्थिक वर्ष 2024-25 साठी दर वाढ करण्यात आली आहे. (Maharashtra Electricity Prices Increase By 5 10 From Today)

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) 1 एप्रिल 2023 पासून नवीन दर लागू केले आहेत. वीज वितरणच्या प्रामुख्याने 4 कंपन्या आहेत. MSEDCL म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड राज्य सरकारद्वारे चालवली जाते. ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची उपकंपनी आहे. शिवाय टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी खाजगी क्षेत्रातही वीज वितरण करतात. मुंबईत बेस्टकडून प्रामुख्याने वीजपुरवठा केला जातो.

महावितरणचे नवे दर :

 • महावितरणने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.9 टक्के आणि 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 5.6 टक्के वाढ केली आहे.
 • या वाढीमुळे आर्थिक वर्ष 2025 पर्यंत निवासी विजेच्या दरात 6 टक्के वाढ झाली आहे.
 • आर्थिक वर्ष 2024 मध्ये औद्योगिक वीज दर 1 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 4 टक्के वाढले आहेत.

टाटा पॉवरचे नवे दर :

 • टाटा पॉवरच्या वीज दरांनुसार, FY2024 साठी दर 11.9 टक्के आणि FY2025 साठी 12.2 टक्के वाढवले आहेत.
 • या दरवाढीमुळे, निवासी विजेच्या वीज दरात आर्थिक वर्ष 2024 मध्ये 10 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 21 टक्के वाढ झाली आहे.
 • उद्योगासाठी, आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 17 टक्क्यांनी दर वाढले आहेत.

अदानी विजेचे नवे दर :

 • अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये, FY2024 साठी 2.2 टक्के आणि FY2025 मध्ये 2.1 टक्के दरवाढ करण्यात आली आहे.
 • निवासी वीज दर आर्थिक वर्ष 2024 मध्ये 5 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 2 टक्क्यांनी वाढला आहे.
 • आर्थिक वर्ष 2024 मध्ये उद्योगासाठी विजेच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
 • FY2025 मध्येही कोणताही बदल झालेला नाही.

बेस्टचे नवे दर :

 • बेस्ट अर्थात बृहन्मुंबई वीज पुरवठा परिवहनने FY2024 मध्ये 5.1 टक्के आणि FY2025 मध्ये 6.3 टक्के वीज दरात वाढ केली आहे.
 • निवासी विजेचा दर FY2024 मध्ये 6.19 टक्के आणि FY2025 मध्ये 6.7 टक्क्यांनी वाढणार आहे.

हेही वाचा – ‘संशयित आरोपीने पाहिला होता लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ, दारुच्या नशेत दिली संजय राऊतांना धमकी’