Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अनिल देशमुखांना अटक करा, याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांची मागणी

अनिल देशमुखांना अटक करा, याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांची मागणी

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच देशमुखांच्या घरासह १० विविध ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता देशमुखांना अटक करा अशी मागणी याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी केली आहे.

अनिल देशमुखांनविरोधात सबळ पुरावे सीबीआयकडे असल्याने त्यांना अटक झाली पाहिले अशी मागणी जयश्री पाटील यांनी केली आहे. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान यावर बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की, मी आधीच सांगितले होते अनिल देशमुख ही मुघलाईन नाही तुम्ही भ्रष्टाचार करून देशाला लूट शकत नाही. कारण हे संविधानाचे, भारतीय कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे तुम्ही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल कारण सीबीआयला दिलेल्या पुराव्यांमुळे देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

सीबीआयला दिलेल्या पुराव्याबाबत बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या, मलबार हिल पोलीस स्थानकात दाखल केलेल्या गुन्ह्याची कॉपी सीबीआयला दिली तसेच सीबीआयला आवश्यक मदत, पुरावे सादर केले. तसेच अनिल देशमुखांमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांचेही पुरावे सीबीआयला दिले आहेत. त्यामुळे सीबीआयने आज गुन्हा दाखल करत देशमुखांच्या घरासह १० विविध ठिकाणी सीबीआय छापेमारी केली आहे.

उच्च न्यायालयाने सीबीआयला 100 कोटी वसुलीच्या आरोपा प्रकरणी अनिल देशमुखांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने एसपी संजय पाटील, याचिकाकर्त्या जयश्री पाटील, निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही चौकशी केली आहे. दरम्यान देशमुख यांचीही कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने ठोस पुरव्यांच्या आधारे हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणात तथ्य असेल तर गुन्हा दाखल करण्याची मुभा कोर्टाने सीबीआयला दिली होती. त्यामुळे सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.


Mansukh Hirean Death Case : हिरेन हत्येप्रकरणी अटकेतले सुनील माने पोलीस दलातून निलंबित


- Advertisement -

 

- Advertisement -