Maharashtra Exit Poll Results 2024 : शिवसेना कुणाची हा निकाल विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगानं दिला. मात्र, लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळाल्या. तर, शिंदेंच्या शिवसेनेला 7 ठिकाणी यश मिळालं होतं. मात्र, आमचा स्ट्राइकरेट ठाकरेंपेक्षा अधिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेटून सांगितलं आहे.
लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक लागली. शिंदेंच्या शिवसेनेनं 81 आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं 95 उमेदवार उभे केले होते. अनेक ठिकाणी ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकली होती. मतदानही पार पडले आहेत. 23 तारखेला निकाल हाती येतील. मात्र, त्यापूर्वी काही संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यानुसार शिंदेंची शिवसेना वरचढ दिसत आहे. तर, ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता आहे.ट
हेही वाचा : महायुती की महाविकास आघाडी, कोण येणार सत्तेत? ‘चाणक्य’चा मोठा एक्झिट पोल समोर
इलेक्ट्रोजल एज, पोल डायरी, चाणक्य स्ट्रॅट्रर्जी आणि मॅट्राईज पोल, असे चार एक्झिट पोल समोर आले आहेत. यातील इलेक्ट्रोजल एज पोल सोडला तर तीनही पोलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला अधिक जागा मिळताना दिसत आहेत.
इलेक्ट्रोजल एज :
शिवसेना ( ठाकरे गट ) : 44
शिवसेना ( शिंदे गट ) : 26
पोल डायरी :
शिवसेना ( ठाकरे गट ) : 16-35
शिवसेना ( शिंदे गट ) : 25-50
चाणक्य स्ट्रॅट्रर्जी :
शिवसेना ( ठाकरे गट ) : 35+
शिवसेना ( शिंदे गट ) : 48+
मॅट्राईज पोल :
शिवसेना ( ठाकरे गट ) : 21-39
शिवसेना ( शिंदे गट ) : 37-45
हेही वाचा : राज्यात महायुती की मविआ? एक्झिट पोलने सांगितला जनतेचा मूड