Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Exit Poll Result 2024 : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती...काय सांगतात...

Maharashtra Exit Poll Result 2024 : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती…काय सांगतात आकडे

Subscribe

राज्यातील मतदान संपले आहे आणि आता एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलनी महायुतीचेच सरकार पुन्हा येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यासोबतच राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण असेल, याबाबतचा अंदाज देखील समोर आला आहे.

मुंबई : राज्यातील मतदान संपले आहे आणि आता एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलनी महायुतीचेच सरकार पुन्हा येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यासोबतच राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण असेल, याबाबतचा अंदाज देखील समोर आला आहे. (maharashtra exit polls result 2024 favorite choice of maharashtra cm eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray)

राज्यातील विधानसभेच्या मतदानाची वेळ संध्याकाळी 6 वाजता संपली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 58 टक्के मतदान झाले आहे. मतदानानंतर राज्यातील सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यातील बहुतेक पोल्सनी महाराष्ट्रात भाजप प्रणित महायुती सरकारच्याच बाजूने कल दर्शवला आहे. असे असले तरी हे कल आहेत. अंतिम निकाल 23 नोव्हेंबरलाच समोर येणार आहे. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री पदासाठी जनता कोणाला प्राधान्य देते, याचा देखील अंदाज समोर आला आहे. राज्यात महायुती आणि मविआ यांच्यातच प्रमुख लढत आहे. बहुमतासाठी 145 जागांचा आकडा पार करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra exit poll : विधानसभेला शिंदे की ठाकरे, कोण ठरतंय वरचढ? एक्झिट पोलचे धक्कादायक आकडे

टाइम्स नाऊने आपल्या एक्झिट पोलसोबतच मुख्यमंत्री पदासाठी जनतेची पसंती कोणाला, याचाही सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. चॅनलच्या मते मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांनाच पहिली पसंती आहे. 32 टक्क्यांहून अधिक लोकांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. दुसऱ्या क्रमांकावरील नाव जरा गोंधळात टाकणारं आहे. कारण, शिंदेंपाठोपाठ जनतेने ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर भाजपाचे ज्येष्ठ नेते, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कौल दिला आहे. तर चौथ्या नंबरवर 7 टक्के जनतेने कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पसंती दिली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी – अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांचे पहिल्या चार क्रमांकात नावच नाही. दरम्यान, मविआ आणि महायुती या दोघांनीही निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरेल असे सांगितले होते.

- Advertisement -

तर दुसरीकडे पीपल्स पल्सच्या आकडेवारीनुसार, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 35.8 टक्के लोकांची पसंती आहे. दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे असून त्यांना 21.7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना 11.7, अजित पवार यांना 2.3 तर नाना पटोले यांना 1.3 टक्के लोकांची पसंती आहे.

दरम्यान, यापूर्वी निवडणूक प्रचारासाठी राज्यात आलेले केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवू असे म्हटले होते. तसेच एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना उत्तर देताना मी या शर्यतीत नाही, मला केवळ राज्याचे भले झालेले पाहायचे आहे, असे उत्तर दिले होते. (maharashtra exit polls result 2024 favorite choice of maharashtra cm eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray)

हेही वाचा – Maharashtra Exit Poll 2024 : राज्यात महायुती की मविआ? एक्झिट पोलने सांगितला जनतेचा मूड


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -