घरमहाराष्ट्रMaharashtra Floods: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्या कोल्हापूर पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा

Maharashtra Floods: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्या कोल्हापूर पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या म्हणजेच ३० जुलै रोजी कोल्हापूरातील पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करणार आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचा पाहणी दौरा करत स्थानिक पातळीरवर पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात घोषणा केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दौरा कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी कोणती मदत जाहीर करतील? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी १० वाजता कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर साडे अकरा वाजता ते सव्वा एकच्या दरम्यान शिरोळ- नृसिंहवाडी परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पुढे कोल्हापूर ६वी गल्ली नाईक अँड कंपनी, शाहूपूर, गंगावेश, शिवाजी पूल रस्ता आणि आसपासच्या भागात पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतील. तर दुपारी दोन वाजता जाहीर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री कोल्हापूर पुरग्रस्त पाहणीसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. तर दुपारी ३ वाजता ते कोल्हापूर विमानतळाहून पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

यापूर्वी २६ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दौऱ्यावर जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांचं हेलिकॉप्टर साताऱ्यात न उतरता पुण्याला माघारी फिरले.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -