घरताज्या घडामोडीCorona: माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन

Corona: माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन

Subscribe

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे आज पुणे येथे निधन झाले.

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे आज पुणे येथे निधन झाले. रात्री २.१५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास असून आज निलंग्यात यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वीच ते कोरोनामुक्त झाले असल्याचे सांगत त्यांना दोन दिवसांपूर्वीच घरी सोडण्यात आले असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी जाहीर केले होते. दरम्यान, त्यांचा बुधवारी मध्यरात्री मृत्यू झाला असून आज त्यांचे शव पुण्याहून निलंग्याकडे रवाना होणार आहे. तसेच आज दुपारी अंत्ययात्रा निघणार असून आजच अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

- Advertisement -

डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच कोरोनावर यशस्वी मात करुन ते घरी आले होते. मात्र, घरी आल्यानंतर पुन्हा त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या आणि त्यातच त्यांचा आज सकाळी पहाटे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. लातूरच्या माजी खासदार रुपाताई निलंगेकर या त्यांच्या सूनबाई, तर राज्याचे माजी मंत्री आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू होत.

- Advertisement -

डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्याविषयी…

डॉ. शिवाजीराव निलंगेकर पाटील हे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते. १९८५-८६ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते. तर १९९०-९१ या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद होते. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे राजकीय जीवन संघर्षमय राहिले. अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून सरकारने त्यांचा गौरव केला. तरी स्वांतत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ त्यांनी कधी घेतला नाही.


हेही वाचा – दिशा सालियनवर बलात्कार करून हत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -