Live Update : संजना घाडी यांची शिवसेना उपनेते पदी नियुक्ती

Maharashtra political crisis navratri 2022 shiv sena uddhav thackeray bjp eknath shinde devendra fadanvis congress mumbai pune monsoon

संजना घाडी यांची शिवसेना उपनेते पदी नियुक्ती

संजना घाडी यांनी शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली

विधान परिषदेच्या उप सभापती निलमताई गोरे, शिवसेना नेते खा.अरविंद सावंत, रविंद्र वाईरकर, उपनेत्या ज्योती ठाकरे,माजी नगरसेवक नामदेव माने उपस्थित होते.


आळंदीच्या वारकऱ्यांनी आज उद्धवसाहेबांची मातोश्री येथे भेट घेतली आणि चर्चा केली. आळंदी येथे वारकऱ्यांसाठी रुग्णालय आणि वारकरी भवन उभारण्याबाबत शिवसेना पाठपुरावा करेल असे आश्वासन यावेळी उद्धवसाहेबांनी दिले.


मुंबईतील प्रभादेवी परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट


चार्ल्स तिसरे ब्रिटनचे नवे किंग


महाराष्ट्रात शेतकऱ्यांना लागू होणार किसान योजना


औरंगाबादची प्रसिद्ध युट्यूब स्टार बिंदास काव्या अखेर मध्य प्रदेशच्या इटारसीमध्ये सापडली


राज ठाकरेंनी मनसे नेते आणि सरचिटणीस यांची बोलावली बैठक, वांद्रे एमआयजी क्लबमध्ये होणार बैठक


नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली अहमदनगरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा, नितेश राणे मोर्चात सहभागी,

लव्ह जिहाद, धर्मांतरण, आदिवासी तरुणांच्या अपहणाविरोधात मोर्चा


मनसेची चौपट्यांवर किनारा स्वच्छता मोहिम, अमित ठाकरेंचाही सहभाग


बाप्पाच्या निरोपासाठी पुणेकरांची गर्दी


लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन

लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवर आरती सुरु

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुक गिरगाव चौपाटीवर दाखल

थोड्याच वेळात लालबागच्या राजाचे विसर्जन


पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणूक अद्याप सुरु


पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज केंद्रीय राज्य विज्ञान परिषदेचे उद्धाटन


राष्ट्रवादी काँग्रेसचं आज राष्ट्रीय अधिवेशन