घरमहाराष्ट्रलॉकडाऊन नको, 'या'वेळेत दुकाने सुरु ठेवा, व्यापारी संघटनांची सीएमकडे मागणी

लॉकडाऊन नको, ‘या’वेळेत दुकाने सुरु ठेवा, व्यापारी संघटनांची सीएमकडे मागणी

Subscribe

गेल्या कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांचा सर्वाधिक फटका अनेक व्यावसायिक, व्यापारी, दुकानदारांना बसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक व्यापारी संघटना आता पुन्हा लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनला विरोध करत आहेत. याचपार्श्वभूमीवर ‘ऑल इंडिया ट्रेडर्स’ या व्यापारी संघटनेने राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनदरम्यान दुकांनाच्या वेळा सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कराव्यात अशी मागणी केली आहे.

राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सरकारकडून योग्य पाऊले उचलली जात आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी पूर्ण लॉकडाऊन घोषित करण्याआधी व्यावसायिक, दुकानदारांना विचार करणे गरजेचे आहे. राज्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोना संसर्गाला रोखणे गरजेचे आहे. परंतु असे करत असताना उद्योगांवरील आर्थिक संकट लक्षात घेतले पाहिजे. कारण या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे कोलमडून पडतात, रोजगारचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण  लॉकडाऊन घोषित करण्याआधी आधीच अडचणीत सापडलेल्या व्यापारी, उद्योजक, दुकानदारांचा विचार करणे गरजेचे असून लॉकडाऊनदरम्यान दुकानदार, व्यावसायिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी द्यावी  अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत मेडिकलप्रमाणे इतर दुकाने, व्यावसायिकांचाही समावेश करावा अशी मागणी व्यापारी संघटना करत आहेत.

- Advertisement -

नागरिकांसाठी दैनंदिन जीवनात वस्तू व सेवा महत्वाच्या आहेत. त्यामुळे राज्यात व्यापाऱ्यांकडूनही मोठ्याप्रमाणात वस्तुंचा पुरवठा होत असतो.परंतु लॉकडाऊनमुळे व्यापारी आणि दुकांनदारांमध्ये असणारी साखळीला ब्रेक लागतो. याचा आर्थिक फटका दुकानदार आणि व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे राज्यातील अनके व्यापारी संघटना, उद्योजक, व्यावसायिक राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

नागपूरमधील व्यापाऱ्यांचा मिनी लॉकडाऊनला विरोध

राज्य सकारने जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊनला नागपूर जिल्ह्यातील दुकानदार, व्यापारी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. यातच आज नागपूर सीताबर्डी परिसरात शकडो व्यापारी, दुकानदारांनी रस्त्यावर उतरून विरोध राज्य सरकारच्या मिनी लॉकडाऊनला कडाडून विरोध दर्शवला. नागपूरातील विविध बाजारपेठांतील व्यापाऱ्यांनी आज रस्तावर येत सरकारी निर्बंधांना विरोध केला. २०२० मध्ये झालेल्या लॉकडाऊनला आम्ही तीन महिन्यापेक्षा अधिक काळ समर्थन देत कडक लॉकडाऊन पाळला. दरम्यान आता एक आठवड्याचा लॉकडाऊनही आम्ही पाळला. परंतु आता पुन्हा लॉकडाऊनच्या निर्णयामुळे आमचे खायचे हाल होत आहेत. दिवसा कमवून खाणाऱ्या दुकानदारांची तर फारच वाईट स्थिती आहे असे मत नागपूरमधील अनेक व्यापारी, दुकानदार व्यक्त करत आहेत. यावेळी रस्त्यावर उतरलेल्या दुकानदार, व्यापाऱ्यांची पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

खारघरमध्येही व्यापारी वर्ग रस्त्यावर

मिनी लॉकडाऊनविरोधात आता कळंबोली, खारघरमधील अनेक व्यापारी रस्त्यावर उतरुन सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. खारघरमधील नवरंग चौकात १५० ते २०० व्यापाऱ्यांनी एकत्र येत पालिकेची गाडी अडवत दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांकडून लॉकडाऊनमुळे मेडिकल वळगता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले जात होते. तसेच संतप्त व्यापाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी पोलीस व्यापारांना जमान न करण्याचे आवाहन करत होते.

राज्य सरकारने वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अभियानांतर्गत नवीन गाईडलाईन्स लागू केल्या आहे. हे नवे नियम ५ एप्रिल सायंकाळी ८ वाजल्यापासून ते ३० एप्रिल रात्री ११.५९ पर्य़ंत लागू असणार आहेत. या नव्या गाईडलाईन्सनुसार राज्यातील सर्व हॉटेल्स, दुकाने, मार्केट, मॉल्स हे ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. तसेच खाजगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहे.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -